Join us

IND Vs WI 3rd One Day : पराभवानंतर टीम इंडियाला चाहत्यांनी केले ट्रोल

या पराभवानंतर विराटचे चाहते चांगलेच वैतागले आणि त्यांनी ट्विटरवर भारतीय संघातील खेळाडूंना ट्रोल करायला सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 14:01 IST

Open in App
ठळक मुद्देअन्य फलंदाजांची विराटला चांगली साथ न मिळाल्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला.

पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या शतकानंतरही भारताला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराबव पत्करावा लागला. या पराभवानंतर विराटचे चाहते चांगलेच वैतागले आणि त्यांनी ट्विटरवर भारतीय संघातील खेळाडूंना ट्रोल करायला सुरुवात केली.

वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे 284 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट हा एकमेव फलंदाज जास्त काळ खेळपट्टीवर ठाण मांडून होता. या सामन्यात त्याने मालिकेतील सलग तिसरे शतकही झळकावले. पण अन्य फलंदाजांची विराटला चांगली साथ न मिळाल्यामुळे भारताला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चाहत्यांनी ट्विटरवर संघातील अन्य खेळाडूंना चांगलेच ट्रोल केले आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज