Join us

IND vs WI, 3rd ODI Live Updates : भारताचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, चार बदलांसह वेस्ट इंडिजला देणार टक्कर 

India vs West Indies, 3rd ODI Live Updates : सलग दोन्ही वन डे सामने जिंकून टीम इंडियाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 13:11 IST

Open in App

India vs West Indies, 3rd ODI Live Updates : सलग दोन्ही वन डे सामने जिंकून टीम इंडियाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या आजच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघात प्रयोग केलेले पाहायला मिळणे अपेक्षित आहेत. आजच्या सामन्यात शिखर धवन सलामीला परत येईल हे कर्णधार रोहित शर्माने आधीच स्पष्ट केले होते. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात तीन बदल पाहायला मिळाले आहेत.  कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर अखेरच्या सामन्यात धवन खेळणार असल्याचे स्पष्ट केले होते. धवनसह एकूण चार खेळाडू एकदिवसीय मालिकेला सुरुवात होण्याआधी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. धवनच्या पुनरागमनानंतर संघाच्या फलंदाजी क्रमवारीत बदल होईल. त्याच्या अनुपस्थितीमध्ये पहिल्या सामन्यात इशान किशन, तर दुसऱ्या सामन्यात रिषभ पंतने रोहितसोबत डावाची सुरुवात केली होती. धवन सलामीला खेळणार आहे. त्यात लोकेश राहुलला दुखापतीमुळे आज खेळता येणार नाही, त्याच्या जागी संघात श्रेयस अय्यरला संधी मिळाली  आहे. 

दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांना केवळ २३७ धावाच काढता आल्या. मात्र गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत विंडीजच्या हातातून सामना हिसकावून आणला. त्यात आता धवनच्या पुनरागमनानंतर भारतीय संघाची ताकद आणखी वाढली आहे. मधल्या फळीत सूर्यकुमार यादवने सातत्यपूर्ण कामगिरी करत आपले स्थान भक्कम केले. तसेच अंतिम संघासाठी उपलब्ध झालेल्या श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळणार का, हेही पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दुखापतीतून सावरलेला कुलदीप यादव पुनरागमनासाठी उत्सुक आहे आणि त्याच्यासाठी युझवेंद्र चहरला बाकावर बसवले आहे. दीपक हुडालाही आज विश्रांती दिली गेली आहे. शार्दूल ठाकूरच्या जागी दीपक चहरची एन्ट्री झाली आहे. 

भारतीय संघ - शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा ( India XI: Rohit Sharma, Shikhar Dhawan, Virat Kohli, Shreyas Iyer, Suryakumar Yadav, Rishabh Pant, Washington Sundar, Deepak Chahar, Prasidh Krishna, Kuldeep Yadav, Mohammed Siraj)

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशिखर धवनलोकेश राहुलकुलदीप यादव
Open in App