Yashasvi Jaiswal Smashes 7th Test Ton During 2nd Test vs West Indies : भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवस शतकी खेळीसह गाजवला. १४३ चेंडूत शतक पूर्ण केल्यावर यशस्वीनं हार्ट सिम्बॉल सिग्नेचर स्टाइलसह शतकी आनंद व्यक्त केला. फेब्रुवारी २०२४ नंतर त्याच्या भात्यातून घरच्या मैदानात आलेले हे पहिले शतक ठरले. आता त्याच्या नजरा द्विशतकावर असतील.
गिलचा विक्रम मोडला
वयाच्या २३ व्या वर्षी या पठ्ठानं शतकी रोमान्सचा सिलसिला दाखवून देत कसोटीत ७ वे शतक झळकावताना कर्णधार शुबमन गिलचा मोठा विक्रमही मोडीत काढला आहे. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे आठवे शतक आहे. वयाच्या २३ व्या वर्षी शुबमन गिलनं आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिन्ही प्रकारात मिळून ७ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे. त्याचा हा विक्रम यशस्वी जैस्वालनं मोडला आहे. कसोटीतील ७ शतकासह टी-२० मध्ये यशस्वीच्या खात्यात एका शतकाची नोंद आहे.
२३ व्या वर्षी सर्वाधिक कसोटी शतक झळकावण्याचा रेकॉर्ड
- १२ – डोन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया), २६ डावांत
- ११ – सचिन तेंडुलकर (भारत), ८० डावांत
- ९ – गेरी सोबर्स (वेस्ट इंडिज), ५४ डावांत
- ७ – यशस्वी जैस्वाल (भारत), अलस्टेअर कुक (इंग्लंड), जावेद मियांदाद (पाकिस्तान), ग्रेम स्मिथ (दक्षिण आफ्रिका), केन विल्यमसन (न्यूझीलंड)
२३ व्या वर्षांपर्यंत भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं
- २२ – सचिन तेंडुलकर, २२० डावांत
- १५ – विराट कोहली, ११९ डावांत
- ८ – यशस्वी जैस्वाल, ७१ डावांत*
- ७ – रवी शास्त्री, ११० डावांत
- ७ – शुभमन गिल, ७३ डावांत