Join us

वेस्ट इंडीजची टीम इंडियाला कडवी टक्कर; तब्बल १२ वर्षानंतर पाहावा लागला 'लाजिरवाणा' दिवस!

IND vs WI 2nd Test: दिल्ली कसोटीतील पहिल्या डावात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर वेस्ट इंडीजच्या संघाने दुसऱ्या डावात पुनरागमन केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:12 IST

Open in App

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल लागला असला तरी, कमकुवत समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने आपल्या खेळीने क्रिकेट जगताला चकित केले. सामन्याच्या चौथ्या दिवशी, भारताने फॉलोऑन दिल्यानंतरही वेस्ट इंडिजने त्यांच्या दुसऱ्या डावात ३५० पेक्षा जास्त धावा करून टीम इंडियाला कडवी टक्कर दिली आणि एक मोठा विक्रम प्रस्थापित केला.

दिल्ली कसोटीतील पहिल्या डावात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर वेस्ट इंडीजच्या संघाने दुसऱ्या डावात पुनरागमन केले. त्यामुळे हा सामना आणखी रोमांचक झाला आहे. शिवाय, भारतीय संघाच्या नावावर लाजिरवाणा विक्रम नोंदवण्यात आला. जानेवारी २०१३ नंतर प्रथमच अशी वेळ आली आहे, जेव्हा भारताविरुद्ध फॉलोऑन खेळणाऱ्या कोणत्याही संघाने दुसऱ्या डावात ३५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.  यापूर्वी, जानेवारी २०१३ मध्ये इंग्लंडने हैदराबाद कसोटीत भारताच्या विरोधात दुसऱ्या डावात ४२० धावा केल्या.

वेस्ट इंडिज जेव्हा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला, तेव्हा त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. मात्र, टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी भारताला वर्चस्व गाजवू दिले नाही. सलामीवीर जॉन कॅम्पबेलने ११५ धावा केल्या. तर, शाई होपने १०३ धावा केल्या. विशेष म्हणजे, वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळण्याची शक्यता कमी असताना, शेवटच्या जोडीनेही ५० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. जस्टिन ग्रीव्हज आणि जेडेन सील्स यांनी संघाला सन्माननीय धावसंख्येपर्यंत नेत केवळ ३५० धावांचा टप्पा पार केला.

English
हिंदी सारांश
Web Title : West Indies Shocks India: Fierce Fightback Ends 12-Year Record!

Web Summary : West Indies stunned India in the second Test, exceeding 350 in their second innings after being forced to follow on. This feat, achieved after 12 years, showcased their resilience and made the match thrilling, despite India's strong bowling attack.
टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजशुभमन गिलऑफ द फिल्ड