Join us

अजिंक्य रहाणेचा उडाला दांडा! वेस्ट इंडिजचे जबरदस्त कमबॅक, ६१ धावांत ४ फलंदाज पाठवले माघारी

India Vs West Indies 2nd Test Live : वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात जबरदस्त कमबॅक केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 00:35 IST

Open in App

India Vs West Indies 2nd Test Live : वेस्ट इंडिजने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात जबरदस्त कमबॅक केले. यशस्वी जैस्वाल व रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी भारताला मजबूत सुरूवात करून दिली, परंत लंच ब्रेकनंतर सामन्याने कटालणी घेतली. विंडीजच्या गोलंदाजांनी ६१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. भारतीय संघात पुनरागमन करणारा अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) याही कसोटीत अपयशी ठरला. 

१६ धावांत ३ विकेट्स! रोहित शर्माची नजर हटी, दुर्घटना घटी; जोमेल वॉरिकनला मिळाली Dream Wicket

यशस्वी आणि रोहित यांनी पहिल्या विकेटसाठी १३९ धावा जोडल्या. ५२ धावांवर यशस्वीला आणखी एक जीवदान मिळाले. लंच ब्रेकनंतर विंडीजला यश मिळाले. जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर मॅकेंझीने सुरेख झेल टिपला. यशस्वी ७४ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार मारून ५७ धावांवर बाद झाला. केमार रोचने विंडीजला दुसरे यश मिळवून देताना शुबमन गिलला १० धावांवर बाद केले. त्यानंतर रोहितही १४३ धावांच ९ चौकार व २ षटकारांसह ८० धावांवर त्रिफळाचीत झाला. बिनबाद १३९ वरून भारताची अवस्था ३ बाद १५५ अशी झाली होती.  ( IND vs WI 2nd Test Live Scoreboard)

अजिंक्य रहाणे व विराट कोहली यांनी संयमी खेळ केला. विंडीजच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या धावांची गती संथ केली. १८ महिन्यानंतर भारतीय संघात परतलेला अजिंक्य पुन्हा अपयशी ठरला. शेनन गॅब्रिएलच्या अप्रतिम चेंडूवर अजिंक्यचा ( ८ ) त्रिफळा उडाला. भारताला १८२ धावांवर चौथा धक्का बसला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजअजिंक्य रहाणेरोहित शर्मा
Open in App