IND vs WI , 2nd Test Day 3 India Enforced Follow On West Indies : कुलदीप यादवनं फिरकीच्या जोरावर भारतीय संघाने दिल्ली कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाला पहिल्या डावात २४८ धावांवर रोखले आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात ५१८ धावांचा डोंगर उभारला होता. वेस्ट इंडिजचा संघ अजूनही २१७० धावांनी पिछाडीवर असून शुबमन गिलनं पाहुण्या संघाला फॉलोऑन देत पुन्हा एकदा संघाला बॅटिंगला बोलवले आहे. डावाने पराभव टाळण्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाला आधी २७० धावा करावल्या लागतील.
वेस्ट इंडिजच्या संघाकडून तळाच्या फलंदाजीतील अँडरनस याने खेळले सर्वाधिक चेंडू
भारतीय संघाने दिलेल्या ५१८ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाने यावेळ बॅटिंगमध्ये पहिल्या सामन्याच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. पण तरीही त्यांना फॉलोऑनची नामुष्की काही टाळता आली नाही. वेस्ट इंडिज विरुद्धच्या संघाकडून पहिल्या डावात अलिक अथनाझे याने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. याशिवाय तळाच्या फलंदाजीत अँडरसन फिलिप याने सर्वाधिक ९७ चेंडू खेळत २४ धावा करत फॉलोऑन टाळण्यासाठी प्रयत्न केला. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. कुलदीप यादवच्या पाच विकेट्स शिवाय रवींद्र जडेजानं ३ तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
याआधी भारतीय संघानं कधी अन् कोणत्या मैदानावर वेस्ट इंडिजला दिला होता फॉलोऑन? निकाल काय लागला?
सामन्याची तारीख | मैदान | देश (भारताची धावसंख्या) | प्रतिस्पर्धी संघ | धावसंख्येतील फरक | निकाल |
---|---|---|---|---|---|
९ ऑक्टोबर २००२ | वानखेडे स्टेडियम | भारत (४५७) | वेस्ट इंडिज (१५७ आणि १८८) | ३०० | भारतानं डाव आणि ११२ धावांनी विजय मिळवला |
१४ नोव्हेंबर २०११ | ईडन गार्डन्स | भारत (७/६३१ डाव घोषित) | वेस्ट इंडिज (१५३ आणि ४६३) | ४७८ | भारतानं डाव आणि १५ धावांनी विजय मिळवला |
२१ जुलै २०१६ | सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम | भारत (८/५६६ डाव घोषित) | वेस्ट इंडिज (२४३ आणि २३१) | ३२३ | भारतानं डाव आणि ९२ धावांनी विजय मिळवला |
४ ऑक्टोबर २०१८ | सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम | भारत (९/६४९ डाव घोषित) | वेस्ट इंडिज (१८१ आणि १९६) | ४६८ | भारतानं डाव आणि २७२ धावांनी विजय मिळवला |
१० ऑक्टोबर २०२५ | अरुण जेटली स्टेडियम | भारत (५१८/५ डाव घोषित) | वेस्ट इंडिज (२४८ आणि ठरायचं आहे) | २७० | निकाल प्रतीक्षेत |
Web Summary : Kuldeep Yadav's spin helped India restrict West Indies to 248 after India scored 518. Trailing by 270 runs, West Indies were forced to follow-on by Shubman Gill to avoid an innings defeat.
Web Summary : कुलदीप यादव की फिरकी से भारत ने वेस्टइंडीज को 248 पर रोका, भारत ने 518 रन बनाए। 270 रनों से पीछे वेस्टइंडीज को पारी की हार से बचने के लिए फॉलोऑन खेलने पर मजबूर किया गया।