Join us

सराव करताना मॅच विनर खेळाडूला दुखापत, दुसऱ्या सामन्यातून माघार; भारताने जिंकला टॉस

India vs West Indies 2nd T20I Live Marathi : वेस्ट इंडिज संघाने पहिल्या ट्वेंटी-२०त ४ धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 19:38 IST

Open in App

India vs West Indies 2nd T20I Live Marathi : वेस्ट इंडिज संघाने पहिल्या ट्वेंटी-२०त ४ धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. युवा खेळाडूंची फौज घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला १५० धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताने हा सामना गमावला अन् आज कर्णधार हार्दिक पांड्या संघात काय बदल करतो, याची उत्सुकता आहे.

इशान किशन व शुबमन गिल यांना पहिल्या सामन्यात साजेसा खेळ करता आला नाही. तिलक वर्मा, हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यादव यांनी चांगली खेळी केली. संजू सॅमसनला अखेरपर्यंत खेळून नायक बनता आले असते, परंतु त्याने घाई केली. गोलंदाजीत मुकेश कुमार, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रभावी कामगिरी केली. सूर्यकुमारला खेळपट्टीवर टिकून खेळ करावा लागणार आहे, प्रत्येक चेंडूवर फटका मारण्याची सवय संघाला महागात पडू शकते. आज त्याचा ५० वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना आहे. 

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कुलदीप यादवला दुखापतीमुळे आज संघाबाहेर बसावे लागले आणि त्याच्या जागी रवी बिश्नोईला संधी मिळाली आहे. नेट मध्ये फलंदाजीचा सराव करताना कुलदीपच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाल्याचे बीसीसीआयने सांगितले.   भारतीय संघ - इशान किशन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजकुलदीप यादवहार्दिक पांड्या
Open in App