Join us

Kieron Pollard, IND vs WI, 2nd ODI Live Updates : किरॉन पोलार्ड आज मैदानावर का नाही उतरला?; IPL आधी वाढणार आहे का Mumbai Indiansची चिंता?

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात दोन्ही संघांत प्रत्येकी एक बदल पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 15:06 IST

Open in App

India vs West Indies, 2nd ODI Live Updates : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात दोन्ही संघांत प्रत्येकी एक बदल पाहायला मिळत आहे. टीम इंडियात लोकेश राहुलचे पुनरागमन झाल्यामुळे मागील सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या इशान किशनला बाकावर बसावे लागले. वेस्ट इंडिजचा कर्णधार  किरॉन पोलार्डलाही आजच्या सामन्याला मुकावे लागले आणि निकोलस पूरनकडे नेतृत्वाची जबाबदारी आली. पोलार्डच्या जागी संघात ओडीन स्मिथला संधी मिळाली आहे. पण, पोलार्ड आजच्या सामन्यात का नाही खेळतोय, हे जाणून घेण्यासाठी सर्व उत्सुक आहेत. त्यात IPL 2022 स्पर्धा तोंडावर असताना पोलार्डची अशी माघारीने मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) चिंता तर वाढणार नाही ना, याचीही भीती चाहत्यांना वाटतेय.  

किरॉन पोलार्डच्या अनुपस्थितित आज निकोलस पूरनने वेस्ट इंडिज संघाच्या नेतृत्वाची कमान सांभाळली. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि त्यात कर्णधार रोहित शर्माने मोठा डाव टाकला. लोकेश राहुलचे पुनरागमन होऊनही रोहितने सलामीला रिषभ पंतला उतरवले. लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन घेऊन उतरलेल्या टीम इंडियाला मात्र चांगली सुरूवात करता आली नाही. केमार रोचचा बाऊन्सरचा अंदाज घेण्यात रोहित चुकला अन् अवघ्या ५ धावा करून तो माघारी परतला. रिषभ व विराट कोहली यांनी सावध खेळ करताना भारताच्या डावाला आकार दिला. पण सलामीला खेळण्याची संधी मिळालेला रिषभ पंत अपयशी ठरला आणि अवघ्या १८ धावा करून तो माघारी परतला.  

१२व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिषभने उत्तुंग फटका मारला, परंतु जेसन होल्डरने धाव घेत सुरेख झेल टिपला. त्यानंतर  ओडी स्मिथने पुढील चार चेंडू  वेगवेगळ्या प्रकारे फेकले आणि सहाव्या चेंडूवर विराटची विकेट घेतली. विराट ३० चेंडूंत ३ चौकारांसह १८ धावांवर बाद झाला.  भारताच्या १२ षटकांत ३ बाद ४३ धावा झाल्या आहेत. 

''किरॉन पोलार्ड आजच्या सामन्यात खेळाण्यासाठी तंदुरुस्त नाही. त्यामुळे त्याला विश्रांती दिली गेली आहे,''असे प्रभारी कर्णधार निकोलस पूरनने सांगितले. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजकिरॉन पोलार्ड
Open in App