Join us

हार्दिक पांड्याकडे नेतृत्व; रोहित शर्मा, विराट कोहलीला विश्रांती, भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारी बदल

IND vs WI 2nd ODI Live Marathi : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना आज खेळला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2023 18:57 IST

Open in App

IND vs WI 2nd ODI Live Marathi : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा वन डे सामना आज खेळला जात आहे. भारताने पहिल्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ आज सामना जिंकून बरोबरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने रोहित शर्माने पहिल्या वन डे सामन्यात युवा खेळाडूंना फलंदाजीच्या क्रमवारीत प्रमोशन दिले होते आणि तो स्वतः सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. आजही भारतीय संघात दोन मोठे बदल पाहायला मिळत आहेत.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीसाठी रोहितएवजी हार्दिक पांड्या आल्याने सर्वांना पहिला आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर हार्दिकने जेव्हा सांगितले की रोहित व विराट कोहली यांना आज विश्रांती दिली गेली आहे, तेव्हा चाहते अधिक बुचकळ्यात पडले. रोहित व विराटच्या जागी संघात संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संधी दिली गेली आहे. त्यामुळे आजही इशान किशन व शुबमन गिल ही जोडी सलामीला खेळताना दिसेल.

भारताचा संघ - इशान किशन, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मुकेश कुमार, शार्दूल ठाकूर, उम्रान मलिक

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजहार्दिक पांड्याविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App