९१ धावांत १० विकेट्स! रोहित, विराटशिवाय टीम इंडिया कमकुवत; वर्ल्ड कपसाठी पात्र न ठरलेल्या विंडीजसमोर शरणागती

IND vs WI 2nd ODI Live Marathi : रोहित शर्मा व विराट कोहली यांच्याशिवाय भारतीय संघ कमकुवत असल्याची प्रचिती आज आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 11:16 PM2023-07-29T23:16:22+5:302023-07-29T23:17:08+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WI 2nd ODI Live Marathi : From 90/0 to 181/10 - India lost 10 wickets for just 91 runs, Ishan Kishan smashed half century  | ९१ धावांत १० विकेट्स! रोहित, विराटशिवाय टीम इंडिया कमकुवत; वर्ल्ड कपसाठी पात्र न ठरलेल्या विंडीजसमोर शरणागती

९१ धावांत १० विकेट्स! रोहित, विराटशिवाय टीम इंडिया कमकुवत; वर्ल्ड कपसाठी पात्र न ठरलेल्या विंडीजसमोर शरणागती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs WI 2nd ODI Live Marathi : रोहित शर्मा व विराट कोहली यांच्याशिवाय भारतीय संघ कमकुवत असल्याची प्रचिती आज आली. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र न ठरलेल्या वेस्ट इंडिज संघाने टीम इंडियाला आरसा दाखवला. ज्या युवा खेळाडूंच्या भरवशावर भारतीय संघ आज मैदानावर उतरला, त्यांनी निराश केले. इशान किशन ( Ishan Kishan) वगळल्यास सर्व फलंदाज अपयशी ठरले. संजू सॅमसनला पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही.

 
रोहित व विराट यांना विश्रांती दिल्याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज मैदानावर उतरला. इशान किशन व  शुबमन गिल यांनी ९० धावांची सलामी दिली. पण, गिल ३४ धावांवर झेलबाद झाला अन् पुढील १३ धावांत विंडीजने ५ विकेट्स मिळवल्या. बिनबाद ९० वरून भारताची अवस्था ५ बाद ११३ अशी झाली. इशानने ५५ धावा केल्या. अक्षर पटेल ( १), हार्दिक ( ७), संजू  सॅमसन ( ९) हे झटपट माघारी परतले. शेफर्डने ३२व्या षटकात रवींद्र जडेजा ( १०) व सूर्यकुमार यांची ३३ धावांची भागीदारी तोडली व भारताला सहावा धक्का बसला. सेट फलंदाज सूर्यकुमारही ( २४) मोतीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. शार्दूल ठाकूरने १६ धावा करून पडझड थांबवली, परंतु गोलंदाजीला अल्झारी जोसेफ येताच भारताची विकेट पडली.


पावसाने सामन्यात व्यत्यय आणला, परंतु वेस्ट इंडिजचा आत्मविश्वास तो डळमळीत करू शकला नाही. उम्रान मलिक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. कार्टीने अप्रतिम झेल घेतला. अल्झारी जोसेफने ३८व्या षटकात हा दुसरा धक्का दिला. भारताचा डाव ४०.५ षटकांत १८१ धावांवर गडगडला. बिनबाद ९० वरून भारत १८१ धावांवर ऑलआऊट झाला. गुडाकेश व शेफर्ड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. 
 

 

Web Title: IND vs WI 2nd ODI Live Marathi : From 90/0 to 181/10 - India lost 10 wickets for just 91 runs, Ishan Kishan smashed half century 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.