Join us  

२० महिने भारतीय संघातून बाहेर; विराटचा जिगरी वेस्ट इंडिज दौऱ्यावर पण नव्या भूमिकेत

IND vs WI 2023 schedule : भारतीय संघात आगामी मालिकेसाठी यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या युवा शिलेदारांना संधी मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2023 5:23 PM

Open in App

ishant sharma commentry debut : भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तिथे कसोटी आणि वन डे मालिका खेळणार आहे. २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला १२ जुलैपासून सुरूवात होत आहे. भारतीय संघात आगामी मालिकेसाठी यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या युवा शिलेदारांना संधी मिळाली आहे. अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत या दोघांपैकी एका खेळाडूचे पदार्पण निश्चित मानले जात आहे. अशातच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा जवळचा सहकारी आणि २० महिन्यांपासून भारतीय संघातून बाहेर असलेला इशांत शर्मा देखील वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला आहे. 

खरं तर इशांत शर्मा आगामी मालिकेतून नव्या इनिंगची सुरूवात करणार असून तो समालोचनामध्ये नशीब आजमावणार असल्याचे कळते. भारत आणि वेस्ट इंडिज कसोटी मालिकेमध्ये समालोचन करण्यासाठी इशांत सज्ज आहे. जिओ सिनेमाने याबाबतची माहिती दिली आहे. लक्षणीय बाब म्हणजे निवृत्ती न घेता समालोचनाकडे वळणारा इशांत पहिला खेळाडू असणार आहे. 

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, मुकेश कुमार.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक 

  1. पहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका (वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) 
  2. दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, (वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) 

 वन डे मालिकेचे वेळापत्रक 

  1. पहिली वन डे - २७ जुलै, बार्बाडोस (वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
  2. दुसरी वन डे - २९ जुलै, बार्बाडोस (वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
  3. तिसरी वन डे - १ ऑगस्ट, त्रिनिदाद (वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजइशांत शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App