Join us

IND vs WI 1st Test : इशान किशनवर का भडकलास? सामन्यानंतर रोहित शर्मानं दिलं उत्तर, मी संतापलेलो कारण...

आर अश्विनच्या फिरकीसमोर विंडीजच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली अन् तीन दिवसात सामन्याचा निकाल लागला. जागतिक कसोटी क्रमवारीत नंबर वन गोलंदाज अश्विनने या सामन्यात १२ विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 13:40 IST

Open in App

India vs West Indies 1st Test : भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात दणक्यात केली. त्यांनी यजमानांना पहिल्या कसोटीत १ डाव व १४१ धावांनी पराभूत करून दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आर अश्विनच्या फिरकीसमोर विंडीजच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली अन् तीन दिवसात सामन्याचा निकाल लागला. जागतिक कसोटी क्रमवारीत नंबर वन गोलंदाज अश्विनने या सामन्यात १२ विकेट्स घेतल्या. त्याने एकूण ५०.३ षटकं टाकताना १३१ धावांत १२ विकेट्स घेतल्या.

 अश्विनशिवाय या सामन्यात पदार्पणवीर यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष होते. यशस्वीने पदार्पणातच १७१ धावांची अविस्मरणीय खेळी केली आणि त्यासाठी त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेच दुसरीकडे इशानने यष्टिंमागे चमकदार कामगिरी करताना काही सुरेख झेल टिपले. पण, फलंदाजीत त्याला २० चेंडू खेळण्याचीच संधी मिळाली आणि त्यातही त्याने कर्णधार रोहित शर्माचा ओरडा खाल्ला...

सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या इशानने नाबाद १ धाव केली. त्याने १५३व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खाते उघडले आणि  रोहितने लगेच पहिला डाव घोषित केला. इशान फलंदाजी करत असताना ड्रेसिंग रुममधून रोहित त्याच्यावर भडकलेला पाहायला मिळाला. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. इशानने एक धाव करण्यासाठी २० चेंडू खेळले. 

रोहित असा का वागला?डाव घोषित करण्याआधी इशानने धाव करावी अशी माझी इच्छा होती. एका षटकानंतर डाव घोषित करायचं आहे हे त्यालाही माहित होतं, असेही रोहित म्हणाला. ''एका षटकानंतर डाव घोषित करायचा आहे याची आठवण मी त्याला करून दिली. त्याआधी इशानने धाव करावी अशी माझी इच्छा होती. मी त्याला तेच सांगत होतो, की धाव कर आणि त्यानंतर आम्ही डाव घोषित करणार होते. तो नेहमी फलंदाजीसाठी उत्सुक असतो, परंतु काल तसं वाटलं नाही आणि त्याने मी संतापलो,''असे तो म्हणाला. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माइशान किशन
Open in App