India vs West Indies 1st Test Live : WTC 2023-25च्या हंगामातील टीम इंडियाची पहिली कसोटी आज वेस्ट इंडिजविरुद्ध होत आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंची सांगड घालून भारतीय संघ आज मैदानावर उतरण्यासाठी सज्ज आहे. भविष्याचा विचार करून संघात काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळत आहेत. यशस्वी जैस्वाल आणि इशान किशन या डावखुऱ्या फलंदाजांनी आज कसोटी संघातून पदार्पण केलं आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
यशस्वी, इशान यांचे पदार्पण; नाणेफेकीचा कौल विंडीजच्या बाजूने, बघा भारताची प्लेइंग इलेव्हन
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत ९८ कसोटी सामने झाले आणि त्यापैकी २२ भारताने, तर ३० वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. ४६ लढती अनिर्णित राहिल्या. पण, मागील २१ वर्षांत वेस्ट इंडिजला भारताविरुद्ध एकही कसोटी जिंकता आलेली नाही. विंडसोर पार्कवर विंडीजने ५ कसोटी सामने खेळले, परंतु त्यापैकी एकच त्यांना जिंकता आलेली आहे. आजच्या सामन्यात यशस्वी जैस्वाल व इशान किशन यांना पदार्पणाची संधी दिली गेली आहे. यष्टीरक्षक केएस भरत आणि इशान यांच्यातही स्पर्धा होती.