India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे.. आर अश्विनने ( R Ashwin) ५ विकेट्स घेत विक्रमांची रांग लागवी. त्याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० विकेट्सचा टप्पा ओलांडला अन् भारताकडून सर्वात कमी इनिंग्जमध्ये पराक्रम करणारा गोलंदाज ठरला. रवींद्र जडेजानेही उत्तम गोलंदाजी केली आणि मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी त्यांना साथ मिळाली. पदार्पणवीर एलिक अथानाझे ( ४७) वगळल्यास वेस्ट इंडिजचे अन्य फलंदाज अपयशी ठरले.
४०००+ धावा अन् ७००+ विकेट्स! R Ashwin ने विक्रमांचे इमले रचले, यशस्वी-इशान-विराटनेही मैदान गाजवले
कर्णधार क्रेग ब्रेथवेट ( २०) आणि तागेनारायण चंद्रपॉल ( १२ ) यांना आर अश्विनने माघारी पाठवले. विंडीजचे दोन्ही सलामीवीर ३८ धावांवर बाद झाले. शार्दूल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकात रेयमंड रेइफर ( २) ची विकेट मिळवली, यष्टींमागे इशान किशनने चांगली कॅच घेतली. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर जेरमेन ब्लॅकवूड ( १४) याचा मोहम्मद सिराजने अफलातून झेल टिपला. भारताने पहिल्या सत्रात २८ षटकांत ६८ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. लंच ब्रेकनंतर रवींद्र जडेजाने चांगला फिरकी चेंडू टाकला अन् जोशुआ डा सिल्वा ( २) कट मारण्याच्या प्रयत्नात इशानच्या हाती झेल देऊन बसला. विंडीजचा निम्मा संघ ७६ धावांत तंबूत परतला.