Join us

इशान किशनने पहिल्याच सामन्यात अजिंक्य रहाणेचा केला अपमान? जिंक्सने दिलं उत्तर, Video Viral

IND vs WI 1st Test :  रविचंद्रन अश्विनची अविश्वसनीय गोलंदाजी आणि पदार्पणात  यशस्वी जैस्वालची विक्रमी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजवर १ डाव व १४१ धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 17:47 IST

Open in App

IND vs WI 1st Test :  रविचंद्रन अश्विनची अविश्वसनीय गोलंदाजी आणि पदार्पणात  यशस्वी जैस्वालची विक्रमी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजवर १ डाव व १४१ धावांनी विजय मिळवला. रोहित शर्मा ( १०३) व विराट कोहली ( ७६) यांना गवसलेला सूर हाही भारतासाठी महत्त्वाचा ठरला. या सामन्यातून यशस्वीसह यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन यानेही पदार्पण केले. त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही, परंतु यष्टीमागील कामगिरीने त्याने प्रभाव टाकला. यष्टींमागून त्याच्या कमेंट्सने तर सर्वांचे लक्ष वेधले. अशीच एक कमेंट त्याने अजिंक्य रहाणेवरही केली अन् तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

IND vs WI 1st Test : इशान किशनच्या १ रन साठी रोहित शर्मा थांबला, त्यानंतर बघा काय प्रकार घडला

इशान किशन सामन्यात विराट, कर्णधार रोहित शर्मा आणि  शुबमन गिलला सूचना देताना दिसला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी किशनने उपकर्णधार अजिंक्य रहाणे ट्रोल केले. तिसर्‍या दिवसाच्या शेवटी हे घडले जेव्हा भारताला कसोटी सामना जिंकण्यासाठी १ विकेटची गरज होती. किशन आणि विराटसह इतर काही भारतीय क्षेत्ररक्षक वेस्ट इंडिजच्या ११व्या क्रमांकाच्या जोमेल वॅरिकनच्या फलंदाजीने चकित झाले. डाव्या हाताच्या फिरकीपटूने आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्याविरुद्ध चांगली फटकेबाजी केली. 

वॉरिकनने तीन चौकार मारून १८ धावा केल्या. त्याच सुमारास किशन अजिंक्यला हा तुझ्यापेक्षा जास्त चेंडू खेळला असे सांगताना ऐकू आले. " आप से ज्यादा बॉल खेल गया ये, अज्जू भाई," किशनने उप कर्णधाराला ट्रोल केले. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या अजिंक्यला थोडासा धक्का बसला आणि त्याने " हा? क्या (काय)?" असे विचारले. रहाणे आदल्या दिवशी ११ चेंडूत ३ धावा काढून बाद झाला होता. 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजइशान किशनअजिंक्य रहाणे
Open in App