India vs West Indies 1st T20I Live Updates : भारत-वेस्ट इंडिज ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना तीन तासांनी सुरू होणार आहे आणि भारतीय संघात मोठा बदल पाहायला मिळतोय. भारताचा उप कर्णधार लोकेश राहुल ( KL Rahul) याने या मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी निवड समितीने त्याच्या जागी संघात संजू सॅमसन ( Sanju Samson) ची निवड केली आहे. आधी जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० संघात संजूचा समावेश नव्हता, परंतु लोकेशच्या माघारीमुळे हा निर्णय घेतला गेला. नुकत्याच पार पडलेल्या वन डे मालिकेत संजू संघाचा सदस्य होता. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
वेस्ट इंडिजने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध मागिल १२ पैकी ११ सामन्यांत पराभव पत्करला आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने मागिल १५ पैकी १४ सामने जिंकले आहेत.
रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी १०८ धावांची गरज आहे. ६ चौकार मारताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५०० चौकार पूर्ण करेल. याशिवाय आज जर त्याने २१ धावा केल्यास ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्या नावावर होईल. रोहितने आज ६ षटकार मारल्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांमध्ये शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी तो बरोबरी करेल.
![]()
वेस्ट इंडिजकडून आज अल्झारी जोसेफ पदार्पण करणार आहे. रोहित शर्माचे पुनरागमन होत असून रिषभ पंत व हार्दिक पांड्या हेही सीनियर खेळाडू विश्रांती नंतर परतले आहेत. रवींद्र जडेजा तंदुरुस्त झाला असून तोही आजच्या सामन्यात खेळणार आहे. रोहितसह रिषभ पंत सलामीला येणार आहे. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन व अर्षदीप सिंग अशी क्रमवारी असेल. लोकेशच्या गैरहजेरीत हार्दिक पांड्याकडे उप कर्णधारपद सोपवले गेले आहे.