Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs WI : जैस्वाल बाकावर तर तिलक वर्माला संधी; टीम इंडियात मोठे बदल; जाणून घ्या संभाव्य प्लेइंग XI

IND vs WI 1st T20 Match : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. 

By ओमकार संकपाळ | Updated: August 3, 2023 13:30 IST

Open in App

IND vs WI 1st T20 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. कसोटी आणि वन डे मालिका खिशात घातल्यानंतर ट्वेंटी-२० मालिकेत देखील यजमानांना धूळ चारण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारताचे युवा शिलेदार मैदानात असणार आहेत. आताच्या घडीला कागदावर तरी भारतीय संघ तगडा वाटत आहे, पण विडिंजच्या संघात अनेक ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट खेळाडूंची एन्ट्री झाली आहे. 

सलामीच्या सामन्यात भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. हार्दिकच्या नेतृत्वात टीम इंडियात पाच फलंदाज, दोन अष्टपैलू आणि चार गोलंदाजांचा समावेश असू शकतो. इशान किशन आणि शुबमन गिल हे सलामीवीर असतील, तर तिलक वर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तसेच सूर्या चार तर संजूला पाचव्या क्रमांकावर खेळवले जाऊ शकते. कर्णधार हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल दोन अष्टपैलू संघात असतील, तर कुलदीप यादव, अर्शदीप सिंग उमरान मलिक आणि आवेश खान यांच्याकडे विडिंजच्या स्फोटक फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी असेल. 

आजच्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग XI हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान. 

वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-२० संघ रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स (उप कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशान थॉमा. 

भारताचा ट्वेंटी-२० संघ -इशान किशन, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव ( उपकर्णधार), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार 

ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक - 

  1. पहिली ट्वेंटी-२० - ३ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
  2. दुसरी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
  3. तिसरी ट्वेंटी-२० - ८ ऑगस्ट, गयाना ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
  4. चौथी ट्वेंटी-२० - १२ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
  5. पाचवी ट्वेंटी-२० - १३ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून)

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजयशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयहार्दिक पांड्या
Open in App