कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील पहिला सामना इडन गार्डनवर खेळवण्यात येत आहे. कसोटी आणि वन डे मालिकेत वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ट्वेंटी-20 मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे. मात्र, या फॉरमॅटमध्ये वेस्ट इंडिज संघाचे पारडे यजमानांपेक्षा वरचढ आहे. त्यात कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी यांची अनुपस्थिती भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते.
06:39 PM
असे आहेत दोन्ही संघ
06:30 PM
कृणालचे आयपीएल व राष्ट्रीय संघातील पदार्पण रोहितच्या नेतृत्वाखालीच
ट्वेंटी-20 संघात स्थान मिळाल्यानंतर कृणाल म्हणाला,''खूप आनंदीत झालो आहे. मी आयपीएल मध्ये पदार्पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केले आणि आता भारतीय संघातही त्याच्याच नेतृत्वाखाली मैदानात उतरत आहे. त्याच्या नेतृत्वाचे कौतुक करावेसे वाटते, कारण तो खेळाडूंना मोकळीक देतो. संघाने दिलेली जबाबदारी मी सक्षमपणे पार पाडेन."
06:20 PM
भारतीय संघात दोन नवीन चेहरे, विंडीजला धक्का
पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यासाठी भारतीय संघात कृणाल पांड्या आणि खलील अहमद हे दोन नवीन चेहरे दिसणार आहे. खलीलने भारताच्या वन डे संघाचे प्रतिनिधित्व केले असले तरी ट्वेंटी-20 संघात तोही पदार्पण करणार आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल हा या सामन्यात खेळणार नाही.