Join us

IND vs WI 1st T20: धोनीऐवजी कार्तिकला पाहून चाहते भडकले

महेंद्रसिंग धोनीऐवजी दिनेश कार्तिकला चाहत्यांनी पाहिले आणि ते चांगलेच भडकले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 17:12 IST

Open in App
ठळक मुद्देजर तुम्हाला धोनी संघात चालत नसेल, तर कार्तिकला का स्थान देण्यात आले? हा सवालही चाहते विचारत आहेत.

कोलकाता, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : इडन गार्डन्सवर रविवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिला ट्वेन्टी-20 सामना खेळवण्यात आला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीऐवजी दिनेश कार्तिकला चाहत्यांनी पाहिले आणि ते चांगलेच भडकले.

ट्वेन्टी-20 संघातून धोनीला वगळण्यात आले. ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये युवा खेळाडू असावे, असे निवड समितीचे म्हणणे होते. त्यामुळे धोनीऐवजी रीषभ पंतला संघात स्थान देण्यात आले होते. पण पहिल्या सामन्यात पंतला संघात घेऊन यष्टीक्षणाची जबाबदारी मात्र दिली नाही. जर धोनीऐवजी पंतला संघात घेतले तर त्याच्यावर यष्टीरक्षणाची जबाबदारी द्यायला हवी होती, असे चाहत्यांचे मत आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला धोनी संघात चालत नसेल, तर कार्तिकला का स्थान देण्यात आले? हा सवालही चाहते विचारत आहेत.

हे काही निवडक ट्विट पाहा

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीदिनेश कार्तिकभारत विरुद्ध वेस्ट इंडिज