Join us

IND vs WI, 1st ODI : भारतीय संघात पहिल्या वन डेसाठी अनपेक्षित बदल, Ishan Kishanसह ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट खेळाडूचा समावेश 

IND vs WI, 1st ODI Live Updates : शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी आणि अक्षर पटेल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय संघात बदल झालेले पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 20:02 IST

Open in App

IND vs WI, 1st ODI Live Updates : शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, नवदीप सैनी आणि अक्षर पटेल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय संघात बदल झालेले पाहायला मिळत आहे. रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला वन डे सामना खेळवण्यात येणार आहे आणि त्यात कर्णधार रोहित शर्मासह ( Rohit Sharma) इशान किशन हा सलामीला उतरणार आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितनं पहिल्या वन डेत इशान सलामीला खेळेल हे निश्चित केले. त्यानंतर आता BCCI ने पहिल्या वन डे साठी संघात अनपेक्षित बदल जाहीर केला. इशानसह BCCIने या सामन्यासाठी ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट फलंदाजाचा संघात समावेश केला आहे.

निवड समितीने शनिवारी पहिल्या वन डे सामन्यासाठी भारतीय संघात दोन खेळाडूंचा समावेश केला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघात इशानसह तामिळनाडूच्या शाहरुख खान ( Shahrukh Khan) याचा समावेश केला आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना शाहरुख खानने सर्वांना प्रभावित केले. त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 33 सामन्यांत 43.35च्या सरासरीने 737 धावा केल्या आहेत.  पहिल्या वन डे साठी भारतीय संघ - रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, इशान किशन, शाहरुख खान. ( Squad for the 1st ODI: Rohit Sharma (Captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Deepak Hooda, Rishabh Pant (wicket-keeper), Deepak Chahar, Shardul Thakur, Yuzvendra Chahal, Kuldeep Yadav, Washington Sundar, Ravi Bishnoi, Mohd. Siraj, Prasidh Krishna, Avesh Khan, Ishan Kishan, Shahrukh Khan.) 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजइशान किशन
Open in App