Join us

IND vs WI, 1st ODI Live Updates : टीम इंडियानं इतिहास घडवला; रोहित शर्माने नाणेफेक जिंकली अन् तगड्या फलंदाजाला पदार्पणाची संधी दिली 

India vs West Indies, 1st ODI Live Updates : रोहित शर्माकडे पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी आल्यानंतरच्या पहिल्याच वन डे सामन्यात भारतीय संघाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 13:31 IST

Open in App

India vs West Indies, 1st ODI Live Updates : रोहित शर्माकडे पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी आल्यानंतरच्या पहिल्याच वन डे सामन्यात भारतीय संघाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला वन डे सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि रोहितने एका तगड्या फलंदाजाला पदार्पणाची संधी दिली. भारताचा हा १००० वा वन डे सामना आहे आणि जगात १००० वन डे सामने खेळणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. आजच्या सामन्यात स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या दीपक हुडाला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.

दीपक हुडाची कामगिरी...दीपकनं ४६ प्रथम श्रेणी, ६८ लिस्ट ए आणि १२३ ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. दीपक हा इंडियन प्रीमिअर लीगमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा सदस्य आहे. आयपीएल २०२१मध्ये दीपकनं ८ सामन्यांत ११६ धावा चोपल्या होत्या. दीपक हुडानं आयपीएल २०२१मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात २८ चेंडूंत ६४ धावा कुटल्या होत्या. त्यापैकी ५२ धावा या केवळ चौकार व षटकारानं आल्या. 

भारताच्या वाटचातील कर्णधार

  • १ पहिली वन डे - अजित वाडेकर वि. इंग्लंड 
  • १०० वी वन डे - कपिल देव वि. ऑस्ट्रेलिया
  •  ५०० वी वन डे - सौरव गांगुल वि. इंग्लंड 
  • ६०० वी वन डे - वीरेंद्र सेहवाग वि. श्रीलंका
  • ७०० वी वन डे - महेंद्रसिंग धोनी वि. इंग्लंड
  • ९०० वी वन डे - महेंद्रसिंग धोनी वि. न्यूझीलंड
  • १००० वी वन डे - रोहित शर्मा वि. वेस्ट इंडिज 

भारतीय संघ -  रोहित शर्मा, इशान किशन, विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज  

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्मा
Open in App