Join us
Daily Top 2Weekly Top 5

U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी

पॉवर प्लेमध्ये त्याने आपल्या फलंदाजीचा खास नजराणा पेश करताना एरॉन जॉर्जच्या साथानं संघाचा डाव सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:35 IST

Open in App

U19 Asia Cup 2025, IND vs UAE  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने UAE विरुद्धच्या लढतीनं अंडर १९ आशिया कप स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात केली आहे. दुबईच्या आयसीसी अकादमीच्या ग्राउंडवर रंगलेल्या पहिल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार आयुष म्हात्रे ११ चेंडूचा सामना करून एका चौकाराच्या मदतीने ४ धावांची भर घालून माघारी फिरला. अवघ्या ८ धावांवर पहिली विकेट गमावल्यावर वैभव सूर्यवंशीनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. पॉवर प्लेमध्ये त्याने आपल्या फलंदाजीचा खास नजराणा पेश करताना एरॉन जॉर्जच्या साथानं संघाचा डाव सावरला. षटकार मारत त्याने ३० चेंडूत अर्धशतक साजरे केले.  

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Suryavanshi's explosive fifty sets U19 Asia Cup ablaze!

Web Summary : Vaibhav Suryavanshi's explosive batting, including a stylish six, propelled India against UAE in the U19 Asia Cup. After an early wicket loss, Suryavanshi's aggressive fifty steadied the innings alongside Aron George, showcasing his talent.
टॅग्स :वैभव सूर्यवंशी