IND vs SL : श्रीलंकेने टॉस जिंकला! वानखेडेवर थरार; सातवा विजय मिळवण्याचे भारतासमोर आव्हान

ICC Odi World Cup 2023 : आज भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 01:38 PM2023-11-02T13:38:59+5:302023-11-02T13:39:06+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL match in ICC ODI World Cup 2023 at Wankhede Stadium in Mumbai Sri Lanka won the toss and elected to bowl first   | IND vs SL : श्रीलंकेने टॉस जिंकला! वानखेडेवर थरार; सातवा विजय मिळवण्याचे भारतासमोर आव्हान

IND vs SL : श्रीलंकेने टॉस जिंकला! वानखेडेवर थरार; सातवा विजय मिळवण्याचे भारतासमोर आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SL Live Match Updates | मुंबई : आज वन डे विश्वचषकात अपराजित भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवला जात आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत असून भारतीय संघ सलग सातवा विजय मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. भारताने चालू विश्वचषकात आतापर्यंतचे सर्व सात सामने जिंकून १२ गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. तर, उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी श्रीलंकेसाठी आजचा सामना 'करा किंवा मरा' असा आहे. आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यजमान भारतीय संघ प्रथम फलंदाजी करेल.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह. 

आजच्या सामन्यासाठी श्रीलंकेचा संघ -
कुसल मेंडिस (कर्णधार), पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अॅंजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंता, महीश तीक्ष्णा, कसुन रजिथा, दुष्मंता चमीरा, दिलशान मदुशंका. 

दरम्यान, श्रीलंकेला सहापैकी केवळ २ सामने जिंकण्यात यश आले. नियमित कर्णधार दासुन शनाकाच्या अनुपस्थित लंकेला खास कामगिरी करता आली नाही अन् संघ ४ गुणांसह गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. 

Web Title: IND vs SL match in ICC ODI World Cup 2023 at Wankhede Stadium in Mumbai Sri Lanka won the toss and elected to bowl first  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.