Join us  

IND vs SL : दीपक चहर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला म्हणाला भारताचा 'गुंडा', जाणून घ्या नेमकं काय झालं!

India vs Sri Lanka, Deepak Chahar : भारताच्या राखीव फळीतील खेळाडूंनी श्रीलंका दौरा गाजवला.. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि कर्णधार म्हणून शिखर धवन यांची ही पहिलीच इनिंग.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 3:13 PM

Open in App

India vs Sri Lanka, Deepak Chahar : भारताच्या राखीव फळीतील खेळाडूंनी श्रीलंका दौरा गाजवला.. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि कर्णधार म्हणून शिखर धवन यांची ही पहिलीच इनिंग. हे दोघंही त्यांच्या कसोटीवर खरे उतरताना दिसत आहेत. भारताच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंनी यजमान श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिला सामना सहज जिंकल्यानंतर टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यात यजमानांनकडून कडवी टक्कर मिळाली. पण, दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी 8व्या विकेटसाठी 84 धावांनी अभेद्य भागीदारी करून भारताला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. कारकीर्दितील पहिले अर्धशतक झळकावणारा दीपक या सामन्यातील नायक ठरला.

मोठी बातमी : टीम इंडियाच्या अष्टपैलू खेळाडूची इंग्लंड दौऱ्यातून माघार; शुबमन गिल, आवेश खान यांच्यांतर आणखी एक धक्का

276 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 7 फलंदाज 193 धावांवर माघारी परतले होते. पण, दीपक ( 69) आणि भुवी ( 19) यांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 84 धावांची भागीदारी करताना संघाला 3 विकेट्स व पाच चेंडू राखून विजय मिळवून दिला. भुवी ( 3/54) आणि युजवेंद्र चहल ( 3/50) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. दीपकनेही दोन विकेट्स घेत श्रीलंकेला 9 बाद 275 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. सलामीवीर अविष्का फर्नांडो ( 50) आणि चरीथ असलंका ( 65) यांनी अर्धशतक झळकावले.

राहुल द्रविडनं पाठवला 'सिक्रेट मॅसेज' अन् टीम इंडियाचा विजय; दीपक चहरनं उलगडले रहस्य!

भारत-श्रीलंका यांच्यातला तिसरा सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. त्याआधी गुरुवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत दीपक चहर म्हणाला, दुसरा सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीनं मला Well Played असा मॅसेज केला. महेंद्रसिंग धोनीचा खेळ खूप जवळून पाहण्याचा फायदा मला दुसऱ्या वन डे सामन्यात झाला. मी अनेक वर्षांपासून त्याचा खेळ पाहतोय आणि तो मॅच फिनिशर आहे. त्याच्यासोबत बोलताना तो एकच सांगायचा की सामना अखेरपर्यंत घेऊन जा..''

यासामन्यात 44व्या षटकानंतर राहुल द्रविडनं एक मॅसेज पाठवला अन् दीपकला संपूर्ण षटकं खेळून काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दीपकनंही खेळात बदल करताना संयमीपणा दाखवला. आज दीपकला मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबद्दल विचारले गेले. त्यावर तो म्हणाला, ''राहुल द्रविड सर फक्त इंदिरा नगरचा गुंडा नाही, तर भारताचा गुंडा आहे. ( त्यानंतर तो हसू लागला).''  काही महिन्यांपूर्वी राहुल द्रविड एका जाहीरातीत झळकला होता आणि त्यात तो मुळ स्वभावाच्या परस्पर विरोधी दाखवला होता. त्यात राहुल भांडताना, बॅटीनं गाड्यांची काच फोडताना दिसला होता. त्यावेळी इंदिरा नगर का गुंडा हा हॅशटॅग ट्रेंड झाला होता.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाराहूल द्रविड