Join us  

IND vs SL : टीम इंडियाच्या ताफ्यात पाच नवे चेहरे; उर्वरित सामन्यांसाठी मुख्य संघात बदल, शिखर धवनबाबत आले मोठे अपडेट्स

India vs Sri Lanka : दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात असलेले आठ खेळाडू हेही विलगिकरणात आहेत, तरीही आज मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 6:01 PM

Open in App

India vs Sri Lanka : दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात असलेले आठ खेळाडू हेही विलगिकरणात आहेत, तरीही आज मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. भारताचे ८ प्रमुख खेळाडू संघाबाहेर असल्यामुळे उर्वरित दोन ट्वेंटी-२० सामन्यांसाठी बीसीसीआयनं मुख्य संघात पाच नव्या चेहऱ्यांचा समावेश केला आहे. Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्षदीप सिंग, साई किशोर आणि समिरजीत सिंग या पाच नव्या चेहऱ्यांना मुख्य संघात सहभागी करून घेतेल गेले आहे. या सर्वांना श्रीलंका दौऱ्यावर नेट गोलंदाज म्हणून नेण्यात आले होते. (Ishan Porel, Sandeep Warrier, Arshdeep Singh, Sai Kishore, Simarjeet Singh, who were all taken to Sri Lanka as net bowlers, have been included as regular members of the squad)

शिखर नाही, पृथ्वी नाही, सूर्यकुमारपण नाही; टीम इंडियाच्या ताफ्यात आज दिसतील बरेच नवे चेहरे

कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर २७ जुलैला होणारा दुसरा सामना स्थगित करण्यात आला आणि नव्या वेळापत्रकानुसार २८ व २९ जुलैला दुसरा व तिसरा ट्वेंटी-२० सामना होणार आहे. कृणालच्या संपर्कात आलेल्या आठही खेळाडूंची RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली आहे, परंतु त्यांना विलगिकरणात रहावे लागणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांचे खेळणे अवघड आहे. पण, एक आनंदाची बातमी म्हणजे कर्णधार शिखर धवन आजच्या सामन्यासाठी उपलब्ध आहे. ( Veteran Shikhar Dhawan is available to lead the side)

कृणालसह ९ खेळाडू उर्वरित मालिकेला मुकल्यामुळे बीसीसीआयची गोची झाली होती, त्यामुळे त्यांनी नेट बॉलर्सचा मुख्य संघात समावेश केला. यापैकी काही खेळाडू आजच्या सामन्यात खेळू शकतील. ANIच्या वृत्तानुसार कृणालच्या संपर्कात येणारे खेळाडू  हार्दिक पांड्या, इशान किशन, कृष्णप्पा गौथम, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, युजवेंद्र चहल व मनिष पांडे हे आहेत. 

 

भारतीय संघ  - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीया, इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाशिखर धवनक्रुणाल पांड्या
Open in App