IND vs SL, 2nd T20I : शिखर नाही, पृथ्वी नाही, सूर्यकुमारपण नाही; टीम इंडियाच्या ताफ्यात आज दिसतील बरेच नवे चेहरे!

India's likely playing 11 for 2nd T20I: भारतीय संघ आज होणाऱ्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. पण, मंगळवारी होणाऱ्या या सामन्यापूर्वी कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् सामना स्थगित करावा लागला.

कृणालच्या संपर्कात टीम इंडियातील ८ खेळाडू आल्यामुळे त्यांनाही विलगिकरणात रहावे लागले आहे. या आठ खेळाडूंमध्ये कर्णधार शिधर धवनसह हार्दिक पांड्या, इशान किशन, कृष्णप्पा गौथम, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, युजवेंद्र चहल यांचा समावेश आहे.

या सर्वांना विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आज होणाऱ्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात त्यांची खेळण्याची शक्यता फार कमीच आहे. तसे झाल्यास आज टीम इंडियाकडून ७ खेळाडू पदार्पण करू शकतील आणि हा एक मोठा विक्रमच ठरेल.

देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आणि नितिश राणा हे खेळाडू आजच्या सामन्यासाठी उपलब्ध आहेत आणि आज भारतीय संघ ७ गोलंदाजांसह मैदानावर उतण्याची शक्यता वाढली आहे. भुवनेश्वर कुमारकडे नेतृत्वाची जबाबदारी असेल.

कुलदीप यादव, राहुल चहर, चेतन सकारिया, नवदीप सैनी आणि वरुण चक्रवर्थी यांच्या खांद्यावर गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. देवदत्त, ऋतुराज, चेतन आणि नितिश यांचे आज पदार्पण होऊ शकते.

भारताची संभाव्या प्लेइंग इलेव्हन - देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, नितिश राणा, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्थी, दीपक चहर, राहुल चहर, चेतन सकारिया, नवदीप सैनी