India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : ट्वेंटी-२० मालिका आधिच खिशात घातल्यानंतर भारतीय संघ आज आणखी दडपणाशिवाय मैदानावर उतरला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटलेला पाहायला मिळाला. आवेश खान व मोहम्मद सिराज यांना आजच्या सामन्यात संधी मिळाली आणि या दोघांनी पहिल्या चार षटकांत श्रीलंकेच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवले. आवेशने दोन षटकांत १ निर्धाव षटकासह दोन धावांत २ विकेट्स घेतल्या, तर सिराजने एक बळी टिपला. रोहित शर्माकडे ( Rohit Sharma) पूर्णवेळ कर्णधारपद आल्यानंतर रोज नवनवीन विक्रम त्याच्याकडून होताना दिसत आहेत. तसाच विक्रम आजही झाला.
मोहम्मद सिराजने पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सलामीवीर दानुष्का गुणतिलकाचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आवेशने दुसऱ्या षटकात पथूम निसांकाला ( १) माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिले. मागील सामन्यात निसांकाने भारतीय गोलंदाजांना झोडले होते. पाठोपाठ आवेशने श्रीलंकेला तिसरा धक्का देताना चरिथ असालंकाची ( ४) विकेट घेतली. उत्तुंग उडालेला चेंडू यष्टिरक्षक संजू सॅमसनने सुरेखरित्या टिपला. श्रीलंकेची अवस्था ३ बाद ११ अशी केली.
रोहित शर्माने मोडला विक्रम
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ( पुरुषांमध्ये) सामने खेळण्याचा विक्रम आता रोहितच्या नावावर आहे. त्याचा हा १२५ वा सामना आहे आणि त्याने पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक ( १२४) याचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही रोहितच्याच नावावर आहे.
सर्वाधिक सामने ( पुरूष क्रिकेट)
सर्वाधिक धावा
- कसोटी - सचिन तेंडुलकर ( १५९२१)
- वन डे - सचिन तेंडुलकर ( १८४२६)
- ट्वेंटी -२० - रोहित शर्मा ( ३३०८)