IND vs SL, 3rd T20I Live Update : ११ चेंडूंत ४८ धावांचा पाऊस!; दासून शनाका धावून आला, भारताच्या गोलंदाजांना झोडून गेला

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : ट्वेंटी-२० मालिका आधिच खिशात घातल्यानंतर भारतीय संघ आज आणखी दडपणाशिवाय मैदानावर उतरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 08:44 PM2022-02-27T20:44:27+5:302022-02-27T20:48:38+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 3rd T20I Live Update : fifty by Dasun Shanaka 74*(38) under pressure, India need 147 runs to whitewash Sri Lanka   | IND vs SL, 3rd T20I Live Update : ११ चेंडूंत ४८ धावांचा पाऊस!; दासून शनाका धावून आला, भारताच्या गोलंदाजांना झोडून गेला

IND vs SL, 3rd T20I Live Update : ११ चेंडूंत ४८ धावांचा पाऊस!; दासून शनाका धावून आला, भारताच्या गोलंदाजांना झोडून गेला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : ट्वेंटी-२० मालिका आधिच खिशात घातल्यानंतर भारतीय संघ आज आणखी दडपणाशिवाय मैदानावर उतरला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटलेला पाहायला मिळाला. आजच्या सामन्यात संधी मिळालेल्या आवेश खान व मोहम्मद सिराज यांनी सुरुवातीलाच श्रीलंकेला धक्के दिले. पण, दासून शनाका पुन्हा एकदा टीम इंडियासमोर नांगर रोवून उभा राहिला. त्याने ११ चेंडूंत ४८ धावांचा पाऊस पाडताना भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. 

मोहम्मद सिराजने पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर सलामीवीर दानुष्का गुणतिलकाचा त्रिफळा उडवला. त्यानंतर आवेशने दुसऱ्या षटकात पथूम निसांकाला ( १) माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिले. मागील सामन्यात निसांकाने भारतीय गोलंदाजांना झोडले होते. पाठोपाठ आवेशने श्रीलंकेला तिसरा धक्का देताना चरिथ असालंकाची ( ४) विकेट घेतली. उत्तुंग उडालेला चेंडू यष्टिरक्षक संजू सॅमसनने सुरेखरित्या टिपला. श्रीलंकेची अवस्था ३ बाद ११ अशी केली. ९व्या षटकात रवी बिश्नोई गोलंदाजीला आला आणि त्याने जनिथ लियानागेला बाद करून श्रीलंकेचा चौथा झटका दिला. त्याची व दिनेश चंडिमलची १४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. १० षटकांत श्रीलंकेचे ४ फलंदाज  ४३ धावांवर माघारी परतले होते.

दिनेश चांडिमल व शनाका यांनी पाचव्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली, परंतु हर्षल पटेलने ही जोडी तोडली. चांडिमल २५ धावांवर बाद झाला. वेंकटेश अय्यरने त्याचा सुरेख झेल टिपला. पण, शनाका पुन्हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला. त्याने सहाव्या विकेटसाठी चामिका करुणारत्नेसह अर्धशतकीय भागीदारी करताना संघाला शतकी पल्ला पार करून दिला. शनाकाने २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. आवेश खानने टाकलेल्या १९व्या षटकात शनाकाने १९ धावा चोपून काढल्या. शनाकाने ३८ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावांची खेळी केली आणि श्रीलंकाने ५ बाद १४६ धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या पाच षटकांत त्यांनी एकही विकेट न गमावता ६८ धावा केल्या. 

Web Title: IND vs SL, 3rd T20I Live Update : fifty by Dasun Shanaka 74*(38) under pressure, India need 147 runs to whitewash Sri Lanka  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.