IND vs SL, 3rd T20, Toss Update: भारतीय संघात मोठे बदल, श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या Playing XI

IND vs SL, 3rd T20, Toss Update: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि ट्वेन्टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्याची नाणेफेक श्रीलंकेनं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 18:44 IST2022-02-27T18:44:21+5:302022-02-27T18:44:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IND vs SL 3rd T20 Toss Update Sri Lanka won the toss and elected to bat | IND vs SL, 3rd T20, Toss Update: भारतीय संघात मोठे बदल, श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या Playing XI

IND vs SL, 3rd T20, Toss Update: भारतीय संघात मोठे बदल, श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या Playing XI

IND vs SL, 3rd T20, Toss Update: श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि ट्वेन्टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्याची नाणेफेक श्रीलंकेनं जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक इशान किशन दुखापतग्रस्त असल्यामुळे आजच्या सामन्यात खेळणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. अखेर रोहित शर्मानंही त्याची पुष्टी केली आहे. पण यावेळी इशान किशनसोबत आणखी तीन मोठे बदल संघात करण्यात आल्याची माहिती त्यानं दिली आहे. भारतीय संघात आज इशान किशन दुखापतीमुळे बाहेर आहे. तर जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांना आराम देण्यात आला आहे. या चौघांच्या जागी भारतीय संघात रवी बिश्नोई, कुलदीप यादव, आवेश खान आणि मोहम्मद सिराज यांना संधी दिली आहे. 

भारतीय संघानं दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी विजयी बढत प्राप्त केली आहे. आजचा सामना जिंकून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा प्रयत्न असणार आहे. गेल्या दोन सामन्यात श्रेयस अय्यर तुफान फॉर्मात असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आजच्या सामन्यातही त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. तसंच संघात संजू सॅमसनलाही संधी मिळाल्यानं त्याच्याकडूनही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीची जादू दिसणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

Team India Playing XI:

रोहित शर्मा (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, रविंद्र जडेजा, हर्षल पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आवेश खान, रवि बिश्नोई

Web Title: IND vs SL 3rd T20 Toss Update Sri Lanka won the toss and elected to bat