Join us  

Rohit Sharma, IND vs SL 2nd Test Playing XI: दुसऱ्या कसोटीसाठी 'या' खेळाडूला टीम इंडियात जागा मिळणं कठीणच! रोहित शर्माकडे आहे दुसरा 'लय भारी' पर्याय

रोहित शर्माने पहिल्या कसोटीत उत्तम नेतृत्व करत संघाला मिळवून दिला दणदणीत विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 1:43 PM

Open in App

Rohit Sharma, IND vs SL 2nd Test Playing XI: भारतीय संघाने पहिली कसोटी मोठ्या फरकाने जिंकली. रोहित शर्माची कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच कसोटी होती. तसेच विराट कोहलीची (Virat Kohli) ही १००वी कसोटी होती. त्यामुळे या कसोटीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं होतं. ही कसोटी भारताने एक डाव आणि २२२ धावांनी जिंकली. पण असं असलं तरी या कसोटीत एका खेळाडूच्या कामगिरी रोहित शर्मा नाराज असल्याचं समजतंय. त्यामुळेच त्या खेळाडूला दुसऱ्या कसोटीत पुन्हा संधी मिळणं कठीणच मानलं जात आहे.

भारतीय चाहत्यांना पहिल्या कसोटीत रविंद्र जाडेजा आणि आर अश्विन यांचा अष्टपैलू खेळ पाहायला मिळाला. जाडेजाने तुफानी १७५ धावांची नाबाद खेळी केली. तर अश्विननेही ६१ धावांची अर्धशतकी खेळी केली. याशिवाय गोलंदाजीतही जाडेजाने दोन्ही डावात मिळून ९ तर अश्विनने ६ बळी टिपले. धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत यानेही ९६ धावांची दमदार खेळी केली. पण रोहित शर्मासोबत सलामीला उतरलेला मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याने मात्र ३३ धावांचीच खेळी केली. लोकेश राहुल संघात नसल्याने त्याला सलामीवीराची जागा मिळाली होती. पण त्याला संधीचं सोनं करता आलं नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी रोहितकडे एक लय भारी पर्याय असल्याचं सांगितलं जातंय.

भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अग्रवाल याला संघात स्थान देण्यात आलं असता त्याने ३३ धावांचीच खेळी केली. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटीसाठी त्याच्या जागी तोडीचा खेळाडू मानला जाणारा सलामीवीर शुबमन गिलला (Shubman Gill) संघात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. गिलने १० कसोटी सामन्यांमध्ये चार अर्धशतकं झळकावली आहेत. त्याच्या नावावर ५५८ धावा आहेत. ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यात त्याने ९१ धावांची अतिशय उपयुक्त खेळी करून दाखवली होती. पण इंग्लंड दौऱ्यावर त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर जावे लागले होते.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्मामयांक अग्रवालशुभमन गिल
Open in App