Mayank Agarwal, IND vs SL, 2nd Test : मयांक अग्रवालची फजिती; एक बॉल, LBW अपील, ठरला No Ball अन् नाट्यमय विकेट, Video

Mayank Agarwal, IND vs SL, 2nd Test : पहिल्या कसोटीतील दणदणीत विजयानंतर भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याच्या निर्धाराने बंगळुरू Pink Ball Test साठी मैदानावर उतरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 02:32 PM2022-03-12T14:32:19+5:302022-03-12T14:36:54+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SL, 2nd Test : Disappointing for Mayank Agarwal, gets distracted by a loud LBW shout and then looks to steal a run, gets stranded mid-way; OUT for 4, Video | Mayank Agarwal, IND vs SL, 2nd Test : मयांक अग्रवालची फजिती; एक बॉल, LBW अपील, ठरला No Ball अन् नाट्यमय विकेट, Video

Mayank Agarwal, IND vs SL, 2nd Test : मयांक अग्रवालची फजिती; एक बॉल, LBW अपील, ठरला No Ball अन् नाट्यमय विकेट, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mayank Agarwal, IND vs SL, 2nd Test : पहिल्या कसोटीतील दणदणीत विजयानंतर भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याच्या निर्धाराने बंगळुरू Pink Ball Test साठी मैदानावर उतरले. रोहित शर्माचा ( Rohit Sharma) हा ४०० आंतरराष्ट्रीय सामना आहे. सचिन तेंडुलकर ( ६६४), महेंद्रसिंग धोनी ( ५३८), राहुल द्रविड (५०९), विराट कोहली ( ४५७), मोहम्मद अझरुद्दीन ( ४३३), सौरव गांगुली ( ४२४), अनिल कुंबळे ( ४०३) यांच्यानंतर भारताकडून ४००+ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा ८वा खेळाडू ठरला आहे. रोहितने त्याच्या या विक्रमी सामन्यात चौकाराने धावांचे खाते उघडले, परंतु मयांक अग्रवालच्या विकेटने टीम इंडियाचे धाबे दणाणले.


रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जयंत यादवच्या जागी आज प्लेइंग इलेव्हनमध्ये अक्षर पटेलचे पुनरागमन झाले. नोव्हेंबर २०२१पासून अक्षर क्रिकेटपासून दूर होता. त्याच्या दुखापतीवर उपचार सुरू होते आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी त्याचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या सर्व अडचणींवर मात करून अक्षर आज मैदानावर परतला आहे.

रोहित व मयांक यांनी टीम इंडियाला चांगली सुरूवात करून देणे अपेक्षित होतं, परंतु दुसऱ्याच षटकात गोंधळ झाला अन् मयांकला माघारी जावं लागलं. विश्वा फर्नांडोच्या गोलंदाजीवर श्रीलंकन खेळाडूंनी मयांकसाठी LBW ची जोरदार अपील केले. मयांक लेग बायवर धाव घेण्यासाठी धावला आणि खेळपट्टीच्या मधोमध येताच रोहितने त्याला माघारी जाण्यास सांगितले. तो धावबाद झाला, परंतु चेंडू स्टम्पला लावण्यापूर्वी यष्टिरक्षक डिकवेलाने DRS घेतला. सरतेशेवटी तो NO Ball असल्याचे समोर आले आणि मयांकची अशी विकेट पडली. मयांक ४ धावांवर धावबाद होऊन माघारी परतला.  

पाहा व्हिडीओ...

 

Web Title: IND vs SL, 2nd Test : Disappointing for Mayank Agarwal, gets distracted by a loud LBW shout and then looks to steal a run, gets stranded mid-way; OUT for 4, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.