Join us  

IND vs SL, 2nd Test : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात बदल, BCCI ने केली घोषणा; जाणून घ्या कधी, केव्हा व कुठे होणार ही लढत

India vs Sri Lanka ,2nd Test, Pink Ball Test : भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात बदल करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 1:52 PM

Open in App

India vs Sri Lanka ,2nd Test, Pink Ball Test : भारत-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या कसोटीत १ डाव व २२२ धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारत-श्रीलंका यांच्यातला दुसरा सामना हा डे नाईट असणार आहे आणि त्यादृष्टीने भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. निवड समितीने दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात अक्षर पटेलचा ( Axar Patel) समावेश केला आहे. अक्षर पटेल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे आणि त्याच्यासाठी बीसीसीआयने कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav) रिलीज केले आहे. ( Kuldeep Yadav has been released from the squad for the second Test.)

BCCI ने २२ फेब्रुवारीला या मालिकेसाठी संघ जाहीर केला. त्यावेळी त्यांनी अक्षर पटेला हा दुखापतीतून सावरत आहे आणि त्यामुळे तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल हे स्पष्ट केले होते. दुसऱ्या कसोटीपूर्वी त्याच्या तंदुरुस्तीच्या चाचणीनंतर निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले होते. डिसेंबरमध्ये न्यूझीलंविरुद्ध मुंबईत झालेल्या कसोटीपासून अक्षर संघाबाहेर आहे. तो आता बंगळुरू कसोटीसाठी उपलब्ध आहे.  

अक्षरच्या येण्याने दुसऱ्या कसोटीत जयंत यादव याला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवले जाऊ शकते.  अक्षर, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्यासह जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी अशी गोलंदाजांची फळी असेल. रोहित, मयांक अग्रवाल, विराट कोहली, हनुमा विहारी, रिषभ पंत व श्रेयस अय्यर असे फलंदाज खेळतील. 

केव्हा व कुठे खेळवली जाणार १२ ते १६ मार्च या कालावधीत बंगळुरू येथे ही कसोटी होणार आहे.

वेळ - दुपारी २.३० वाजल्यापासून कसोटीला सुरुवात होणार आहे.

भारतीय संघ - रोहित  शर्मा ( कर्णधार), प्रियांक पांचाल, मयांक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन  गिल, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव,  आर अश्विन, अक्षर पटेल, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह ( उप कर्णधार). ( India’s squad for the second Test: Rohit Sharma (Captain), Priyank Panchal, Mayank Agarwal, Virat Kohli, Shreyas Iyer, Hanuma Vihari, Shubhman Gill, Rishabh Pant (wicketkeeper), KS Bharat, Ravindra Jadeja, Jayant Yadav, R. Ashwin, Saurabh Kumar, Mohd. Siraj, Umesh Yadav, Mohd. Shami, Jasprit Bumrah (vice-captain), Axar Patel)   

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाअक्षर पटेलकुलदीप यादव
Open in App