India vs Sri Lanka 2nd T20I Live : कुसल मेंडिस व पथुम निसंका यांनी श्रीलंकेला आक्रमक सुरुवात करून दिली आणि भारताच्या गोलंदाजांची चांगली धुलाई झाली. पण, युझवेंद्र चहलने पहिले यश मिळवून दिले. उम्रान मलिकने ( Umran Malik) पुन्हा एकदा वेगाने सर्वांचे लक्ष वेधले. पहिल्या सामन्यात १५५ kmph च्या वेगाने उम्रानने चेंडू टाकला होता अन् आजही त्याने भन्नाट वेगवान चेंडू टाकून भानुका राजपक्षाचा त्रिफळा उडवला.
अर्शदीप सिंगची 'हॅट ट्रिक', पण नकोशी; ४ चेंडूंत दिल्या १४ धावा, हार्दिकचा चढला पारा
राहुल त्रिपाठी आणि अर्शदीप सिंग आजच्या सामन्यात खेळणार आहेत आणि संजू सॅमसन व हर्षल पटेल यांना बाहेर बसावे लागले. संजूने दुखापतीमुळे मालिकेतूनच माघार घेतली आहे. भारताकडून ट्वेंटी-२०त पदार्पण करणारा राहुल त्रिपाठी हा तिसरा वयस्कर खेळाडू ठरला. आज राहुल त्रिपाठीने ३१ वर्ष व ३०९ दिवसांचा असताना पदार्पण केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची आयती संधी सोडून कर्णधार हार्दिक पांड्याने गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. हार्दिकने पहिल्या षटकात केवळ ४ धावा दिल्या होत्या. पण, आज पुनरागमन करणाऱ्या अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh) नकोशी हॅटट्रिक नोंदवली अन् हार्दिकचा पारा चढला. ( India vs Sri Lanka Live Scorecard Click here )
उम्रान मलिकने भन्नाट चेंडू टाकून भानुका राजपक्षाचा ( २) त्रिफळा उडवला. चहलने त्याच्याच गोलंदाजीवर पथुम निसंकाचा झेल सोडला. पण, अक्षर पटेलने ही विकेट मिळवून दिली, राहुल त्रिपाठीने अप्रतिम झेल घेतला. निसंका ३३ धावांवर माघारी परतला. खेळपट्टीवर आता दोन्ही नवीन फलंदाज होते आणि भारतीय गोलंदाजांना कमबॅक करण्याची हीच ती वेळ होती. अक्षरने श्रीलंकेला चौथा धक्का देताना धनंजया डी सिल्वाला ( ३) बाद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"