India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : विराट कोहलीची १००वी कसोटी अन् रोहित शर्माचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना पण रिषभ पंतने ( Rishabh Pant) भाव खाल्ला... अर्धशतसाठी ७५ चेंडू खेळून काढणाऱ्या रिषभने पुढील २० चेंडूंत त्याने ४६ धावा कुटल्या. रिषभच्या नेत्रदिपक खेळीला पुन्हा एकदा नजर लागली अन् त्याला शतकाने हुलकावणी दिली. विराट ( Virat Kohli), हनुमा विहारी ( Hanuma Vihari) यांनी पाया सेट केल्यानंतर रिषभने सुरुवातीला श्रेयस अय्यर आणि नंतर रवींद्र जडेजासह उल्लेखनीय भागीदारी करून भारताला पहिल्या दिवशी वर्चस्व मिळवून दिले. श्रेयससह ५३ धावांच्या भागीदारीनंतर रिषभने सहाव्या विकेटसाठी जडेजासह शतकी भागीदारी केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IND vs SL, 1st Test Live Updates : Rishabh Pantचा नेत्रदिपक खेळ, शतकाचा घालू शकला नाही मेळ; भारताची मजबूत पकड
IND vs SL, 1st Test Live Updates : Rishabh Pantचा नेत्रदिपक खेळ, शतकाचा घालू शकला नाही मेळ; भारताची मजबूत पकड
India vs Sri Lanka, 1st Test Live Updates : विराट कोहलीची १००वी कसोटी अन् रोहित शर्माचा कर्णधार म्हणून पहिलाच कसोटी सामना पण रिषभ पंतने ( Rishabh Pant) भाव खाल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:06 IST