IND vs SA Virat Kohli Smashed Back To Back Century : विराट कोहलीनं रांची वनडे सामन्यानंतर रायपूरच्या मैदानातील दुसऱ्या वनडे सामन्यात सलग दुसरे शतक झळकावले आहे. दोन वर्षांनी त्याच्या भात्यातून वनडे क्रिकेटमध्ये बॅक टू बॅक शतक पाहायला मिळाले. विराट कोहलीनं रायपूरच्या मैदानातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात ९० चेंडूत शतक साजरे केले. लुंगी एनिगडीनं ९३ चेंडूत ७ चौकार आणि २ षकाराच्या मदतीने १०२ धावांवर कोहलीच्या खेळीला ब्रेक लावला. त्याआधी कोहलीनं ५३ व्या वनडे शतकासह अनेक विक्रमांना गवसणी घातली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलग दुसऱ्या शतकासह सेट झाला खास रेकॉर्ड
वनडेत सर्वाधिक शतकांचा आपला विक्रम अधिक भक्कम करताना कोहलीनं ११ व्या वेळी सलग दोन शतके झळकवण्याचा पराक्रम करून दाखवला. याबाबतीत त्याच्या जवळपासही कोणी दिसत नाही. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय हिटमॅन रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते.
सर्वाधिक वेळा सलग दोन शतके झळकावणारे फलंदाज
- विराट कोहली- ११ वेळा
- एबी डिव्हिलियर्स - ६ वेळा
- रोहित शर्मा- ४ वेळा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरीची हॅटट्रिक
२०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत कोलकाताच्या मैदानात विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १०१ धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानतंर रांचीच्या मैदानात कोहलीनं १३५ धावांची खेळी साकारल्याचे पाहायला मिळाले. आता रायपूरच्या मैदानात कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग तिसरी सेंच्युरी ठोकल्याचे पाहायला मिळाले.
असा पराक्रम करणारा विराट पहिला आणि एकमेव फलंदाज
विराट कोहलीनं वेगवेगळ्या चार प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध किमान सात किंवा त्यापेक्षा अधिक शतके झळकवण्याचा खास विक्रमही सेट केला आहे. श्रीलंका विरुद्ध त्याने सर्वाधिक १० शतके झळकावली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेत कोहलीनं ९ शतके झळकावली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ८ शतकापाठोपाठ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेत त्याच्या खात्यात ७ शतकांची नोंद झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकांचा बादशाह सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत फक्त ऑस्ट्रलिया (९) आणि श्रीलंका (९) या दोन संघाविरुद्धच ७ पेक्षा अधिक शतके झळकावली आहेत.