Join us  

Ind Vs SA Virat Kohli : राष्ट्रगीतादरम्यान विराटच्या 'त्या' कृतीमुळे नेटकरी संतापले, पाहा नक्की घडलं तरी काय?

विराटचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर झाला मोठ्या प्रमाणात व्हायरल. नेटकऱ्यांनीही व्यक्त केला संताप.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:00 AM

Open in App

IND vs SA 3rd ODI Updates Virat Kohli: अष्टपैलू दीपक चहरच्या झुंजार खेळीनंतरही भारताला वन डे मालिकेतील शेवटच्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. प्रथम फलंदाजी करताना क्वींटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर आफ्रिकेने २८७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शिखर धवन आणि विराट कोहलीने अर्धशतके केली होती. त्यानंतर योग्य वेळी दीपक चहरने तुफान फटकेबाजी करत अर्धशतक ठोकलं, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्यानंतर मात्र शेवटच्या षटकात ५ चेंडूत ५ धावा हव्या असताना युजवेंद्र चहल झेलबाद झाला आणि भारताला ४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासह दक्षिण आफ्रिकेने वन डे मालिका ३-०ने जिंकत टीम इंडियाला व्हाईटवॉश दिला. परंतु या सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या (Virat Kohli) एका कृत्यामुळे सर्वांनीच संताप व्यक्त केला.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान विराटचं एक कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. सामन्यापूर्वी राष्ट्रगीतादरम्यान (National Anthem) विराट कोहली च्युईंग गम खाताना दिसला. त्याचं है कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आणि नंतर तो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर (Social Media) व्हायरलही झालं. राष्ट्रगीताचा अवमान केल्याचं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी विराटवर संताप व्यक्त केला. यापूर्वीही विराटनं असं कृत्य केलं होतं. २०१७ मध्ये श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता त्यावेळीही राष्ट्रगीतादरम्यान च्युईंग गम खाताना दिसला होता. त्यावेळीही अनेकांनी त्याच्या त्या कृत्यावर संताप व्यक्त केला होता.

टॅग्स :विराट कोहलीराष्ट्रगीतभारतीय क्रिकेट संघ
Open in App