Virat Kohli Make Fun Of Yashasvi Jaiswal Tere Naam Hairstyle : MS धोनीच्या रांची येथील झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या घरच्या मैदानात विराट कोहलीचा जलवा पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वनडेत खेळत असलो तरी १२० टक्के देण्याची ताकद त्याने विक्रमी शतकी खेळीसह दाखवून दिली. विराट कोहलीनं या सामन्यात १२० चेंडूत ११ चौकारासह ७ षटकाराच्या मदतीने १३५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीशिवाय कोहलीचा एक मजेशीर अंदाजीतील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओमध्ये विराट चक्क सलमान खानच्या 'तेरे नाम' चित्रपटातील "लगन लगी..." गाण्यावरील डान्स स्टेप्स करुन दाखवताना दिसते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
युवा बॅटरची हेअरस्टाइल बघून विराटमध्ये अवतरला सलमान; व्हिडिओ व्हायरल
विराट कोहलीसह भारतीय क्रिकेट संघातील अनेक स्टार आपल्या मैदानातील कामगिरीशिवाय स्टायलिश लूकमुळे चर्चेत असतात. भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खास हेअर स्टाईलसह मैदानात उतरला आहे. यशस्वीनं मिडल पार्टिशन हेअर स्टाइलला पसंती दिल्याचे दिसते. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान याने 'तेरे नाम' या लोकप्रिय चित्रपटात हीच हेअर स्टाइल पाहायला मिळाली होती. याच गोष्टीवरून विराट कोहलीनं सर्व सवंगड्यांसमोर युवा बॅटरची मजा घेताना त्याच्यासमोर लगन लगी गाण्याच्या स्टेप्स करून दाखवल्याचे पाहायला मिळाले.
Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की कोहली? वनडेतील सर्वोत्तम फलंदाज कोण? गावस्कर म्हणाले...
यशस्वीचा फलंदाजीत फ्लॉप शो! हिटमॅन रोहितसह विराटचा धमाका!
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यशस्वी जैस्वाल याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. रोहितसोबत त्याने डावाची सुरुवात केली. पण संघाच्या धावफलकावर अवघ्या २५ धावा असताना १८ धावांवर तो तंबूत परतला. अल्प धावसंख्येवर पहिली विकेट गमावल्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली जोडी जमली. या दोघांनी शतकी भागीदारी करत भारतीय संघाचा पाया मजबूत केला. रोहित शर्मानं अर्धशतकी खेळीत ३ उत्तुंग षटकार मारत शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढत वनडेत 'सिक्सर किंग' होण्याचा डाव साधला. दुसऱ्या बाजूला विराट कोहलीनं सर्वाधिक वनडे शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकत अव्वलस्थान पटकावले. तो वनडेतील 'सेंच्युरी किंग' झाल्याचे पाहायला मिळाले.