भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना धर्मशालाच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बरोबरीत असलेल्या मालिकेत आघाडीचा डाव साधण्यासाठी टीम इंडिया दोन बदलासह मैदानात उतरली आहे. जसप्रीत बुमराहसह अक्षर पटेल यांच्या जागी कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराह प्लेइंग इलेव्हनमधून आउट
नाणेफेकीनंतर सूर्या म्हणाला की, विकेटमध्ये फारसा बदल होणार नाही. दव आधीच पडायला सुरुवात झाली आहे. हे एक चांगले मैदान आहे. येथील प्रेक्षक आणि लोक खूपच अद्भुत आहेत. आम्ही त्यांचे मनोरंजन करू अशी अपेक्षा आहे. प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. तुम्ही कमबॅक कसे करता, ही या खेळातील सुंदरता आहे. संघात बदल करायची इच्छा नव्हती. अक्षर पटेल आजारी आहे तर बुमराह वैयक्तिक कारणास्तव घरी परतला आहे. त्यामुळेच संघात बदल करण्यात आले आहेत, असे कर्णधाराने नाणेफेकीनंतर स्पष्ट केले. बुमराह मालिकेतील उर्वरित सामन्यांत दिसणार का? त्याच उत्तर अजून तरी गुलदस्त्यातच आहे.
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
भारत प्लेइंग इलेव्हन :
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक/ फलंदाज), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन :
रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एडन मार्करम (कर्णधार), डेवॉल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोव्हन फेरेरा, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, ॲनरिक नॉर्टजे, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.