Join us  

IND vs SA, 3rd day 3 Test Live Updates : रिषभ पंतची अकडम-तिकडम फलंदाजी; बॅट एकीकडे अन् चेंडू दुसरीकडे, धाव घेण्यासाठी पळाला भलतीकडे, पाहा ४ भन्नाट Video 

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या निर्णयाक व तिसऱ्या कसोटीत रिषभ पंतनं ( Rishabh Pant) भाव खाल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 8:12 PM

Open in App

India vs South Africa, 3rd day 3 Test Live Updates : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या निर्णयाक व तिसऱ्या कसोटीत रिषभ पंतनं ( Rishabh Pant) भाव खाल्ला... मागील सामन्यात शॉर्ट सिलेक्शन वरून त्याच्यावर टीका झाली आणि त्यानं लगेच आपल्या खेळात बदल केलेला दिसला. विराट कोहली संयमी खेळ करताना रिषभ मुक्तपणे फटकेबाजी करताना दिसला. पण, विराट जेव्हा माघारी परतला तेव्हा रिषभ बचावात्मक मोडमध्ये गेला. त्यानं परिपक्व खेळ करताना नाबाद १०० धावा करून अनेक विक्रम मोडले. भारताचा दुसरा डाव १९८ धावांवर माघारी परतला अन् दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले गेले. 

या सामन्यात रिषभनं दमदार खेळीसह सर्वांचे मनोरंजनही केले. ऑलिव्हरच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारताना रिषभची बॅट एकीकडे गेली तर चेंडू दुसरीकडे गेला. तेच त्यानं पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा अतरंगी प्रयत्न केला. त्याचा असाच एक प्रयत्न फसला तेव्हा तो यष्टींच्या समानरेषेत धावत सुटला अन् धाव पूर्ण केल्याची अॅक्टींग करू लागला. 

पाहा त्याचे भारी व्हिडीओ... 

लोकेश राहुल ( १०),  मयांक अग्रवाल ( ७), चेतेश्वर पुजारा ( ९) आणि अजिंक्य रहाणे ( १) हे माघारी परतल्यानं भारताची अवस्था ४ बाद ५८ अशी झाली होती. पण, रिषभ व विराटनं टीम इंडियाचा डाव सावरला.  लंच ब्रेकनंतर भारताला पाचवा धक्का बसला. १४३ चेंडूंत २९ धावा करणारा विराट कोहली परतला माघारी परतला अन् रिषभ पंतसोबतची ९४ धावांची भागीदारी संपुष्टात आली.विराट माघारी परतला अन् भारताची गाडी घसरताना दिसली. आक्रमक मोडमध्ये असलेल्या रिषभला मग बचावात्मक खेळ करावा लागला. एका बाजूनं तो डाव सावरून होता, परंतु समोर विकेट पडल्या. आर अश्विन ( ७), शार्दूल ठाकूर (५) व उमेश यादव (०) हे झटपट माघारी परतले. रिषभनं १३१ चेंडूंत शतक पूर्ण केलं. जसप्रीत बुमराह ( २) बाद झाला अन् भारताचा दुसरा डावही आटोपला. भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मार्को येनसन ( ४-३८), कागिसो रबाडा ( ३-५३) आणि लुंगी एनगिडी ( ३-२१) यांनी सुरेख कामगिरी केली.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारिषभ पंत
Open in App