IND vs SA, 2nd Test Live Updates : लोकेश राहुलच्या वर्तनावर चिडले मैदानावरील पंच, टीम इंडियाच्या कर्णधाराला मागावी लागली माफी, Video 

India vs South Africa, 2nd Test Live Updates : जोहान्सबर्ग कसोटी लोकेश राहुलच्या ( KL Rahul) कायम लक्षात राहणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 08:25 PM2022-01-03T20:25:54+5:302022-01-03T20:26:48+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 2nd Test Live Updates :  Umpire unhappy at KL Rahul for late pull-out against Kagiso Rabada, India's stand-in skipper apologises, Video | IND vs SA, 2nd Test Live Updates : लोकेश राहुलच्या वर्तनावर चिडले मैदानावरील पंच, टीम इंडियाच्या कर्णधाराला मागावी लागली माफी, Video 

IND vs SA, 2nd Test Live Updates : लोकेश राहुलच्या वर्तनावर चिडले मैदानावरील पंच, टीम इंडियाच्या कर्णधाराला मागावी लागली माफी, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 2nd Test Live Updates : जोहान्सबर्ग कसोटी लोकेश राहुलच्या ( KL Rahul) कायम लक्षात राहणार आहे. मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी रोहित शर्मानं माघार घेतली अन् लोकेशला उप कर्णधारपद मिळाले. त्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीतून विराटनं माघार घेताच कर्णधारपदाची माळही लोकेशच्या गळ्यात पडली. लोकेशनं जबाबदारीनं खेळ करताना अर्धशतकी खेळी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, या सामन्यात लोकेशच्या एका कृतीवर मैदानावरील पंचांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि भारताच्या कर्णधाराला सर्वांसमोर Sorry म्हणावं लागलं.

डावाच्या चौथ्या षटकात कागिसो रबाडा गोलंदाजी करत असताना लोकेशनं अचानक त्याला थांबवले. तोपर्यंत रबाडा धावत खेळपट्टीच्या अर्ध्यावर परतला होता. त्याच्या या वागणुकीवर मैदानावरील पंच मराईस इरास्मुस यानं नाराजी व्यक्त केली. त्यानं लोकेशला वॉर्निंग दिली. लोकेशनंही चूक मान्य करत लगेच सॉरी म्हटले.   

पाहा व्हिडीओ...


भारताकडून कर्णधार लोकेश राहुल आणि आर अश्विन वगळता इतरांनी निराशाजनक कामगिरी केली. लोकेशच्या अर्धशतकानंतर अश्विनच्या ४६ धावांनी टीम इंडियाला समाधानकारक मजल मारून दिली.  ५ बाद ११६ अशी अवस्था असताना अश्विन मैदानावर उतरला अन् दमदार खेळ केला. लोकेश १३३ चेंडूंत ९ चौकारांसह ५० धावांवर बाद झाला.  अश्विननं  ५० चेंडूंत ६ चौकारासह ४६ धावा केल्या. भारताचा पहिला डाव २०२ धावांवर संपुष्टात आला. 
 

Web Title: IND vs SA, 2nd Test Live Updates :  Umpire unhappy at KL Rahul for late pull-out against Kagiso Rabada, India's stand-in skipper apologises, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.