Join us  

IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजच्या ६ विकेट्स, दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ ५५ धावांत तंबूत

IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजने ( Mohammed SIRAJ ) दुसऱ्या कसोटीचे पहिले सत्र गाजवले. त्याने पहिल्या स्पेलमध्ये ९-३-१५-६ अशी भन्नाट गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 3:35 PM

Open in App

 IND vs SA 2nd Test   (Marathi News) : मोहम्मद सिराजने ( Mohammed SIRAJ ) दुसऱ्या कसोटीचे पहिले सत्र गाजवले. त्याने पहिल्या स्पेलमध्ये ९-३-१५-६ अशी भन्नाट गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. त्याला जसप्रीत बुमराह व मुकेश कुमार यांची मिळालेली साथ अप्रतिम होती. भारताविरुद्धची कोणत्याही संघाची कसोटीतील ही सर्वात निचांक कामगिरी ठरली.

सिराजने चौथ्या षटकात एडन मार्करमला ( २) झेलबाद करून माघारी पाठवले. कर्णधार डीन एल्गर ( ४) याचाही सिराजने त्रिफळा उडवला. आफ्रिकेला बसलेला हा खूप मोठा धक्का होता. टॉनी डे जॉर्जी ( २) व पदार्पणवीर त्रिस्तान स्टब्स ( ३) हेही फार काही करू शकले नाही. जसप्रीत बुमराहने ९व्या षटकात स्टब्सला बाद केले, तर सिराजने जॉर्जीचा अडथळा दूर केला. सिराज एक्स्प्रेस इथेच थांबली नाही आणि त्याने डेव्हिड बेडिंगहॅम ( १२) व मार्को यानसेन ( ०) यांचा अडथळा दूर करताना आफ्रिकेची अवस्था ६ बाद ३४ अशी केली. त्यात कायले वेरेयने ( १५) याच्या विकेटची भर पडली. सिराजने त्याच्या ८.५ षटकांत १५ धावा देताना ६ विकेट्स घेतल्या. ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली.   मुकेश कुमारने त्याच्या पहिल्या षटकात आफ्रिकेला धक्का देताना केशव महाराजला ( ३) बाद केले. जसप्रीतनेही सामन्यातील दुसरी विकेट घेतली आणि नांद्रे बर्गरचा ( ४) बळी घेताना आफ्रिकेला नववा धक्का दिला. मुकेशने सान्यातील दुसरी विकेट घेऊन आफ्रिकेला ५५ धावांवर ऑल आऊट केले. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामोहम्मद सिराजजसप्रित बुमराह