लोकेश राहुलची पहिली चूक टीम इंडियाला पडतेय भारी; आफ्रिकेच्या फलंदाजाने ठोकली सेंच्युरी

जसप्रीतने मोठी विकेट जवळपास मिळवून दिली होती, परंतु लोकेश राहुलच्या ( KL Rahul) चुकीने ती विकेट नाही मिळाली. ही चूक टीम इंडियाला आता महागात पडतेय. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 02:53 PM2024-01-04T14:53:33+5:302024-01-04T14:53:48+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA 2nd Test : First dropped catch of the series from KL Rahul! Extra bounce from Jasprit Bumrah. Aiden Markram smashed century | लोकेश राहुलची पहिली चूक टीम इंडियाला पडतेय भारी; आफ्रिकेच्या फलंदाजाने ठोकली सेंच्युरी

लोकेश राहुलची पहिली चूक टीम इंडियाला पडतेय भारी; आफ्रिकेच्या फलंदाजाने ठोकली सेंच्युरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA 2nd Test  (Marathi News) : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या  दुसऱ्या दिवशीही आफ्रिकेची अवस्था वाईट झाली आहे. जसप्रीत बुमराहने ( Jasprit Bumrah) त्याच्या पहिल्याच षटकात विकेट घेऊन यजमानांना बॅकफूटवर फेकले. त्यानंतर आणखी दोन धक्के देत त्याने डावात पाच विकेट्स पूर्ण करताना अनेक विक्रम नावावर केले. जसप्रीतने मोठी विकेट जवळपास मिळवून दिली होती, परंतु लोकेश राहुलच्या ( KL Rahul) चुकीने ती विकेट नाही मिळाली. ही चूक टीम इंडियाला आता महागात पडतेय. 

Image
कालच्या ३ बाद ६२ धावांवरून सुरुवात करणाऱ्या आफ्रिकेला दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने  धक्का दिला आणि डेव्हिड बेडिंगहॅम ( ११) झेलबाद झाला. त्यानंतर बुमराहने आफ्रिकेला धक्का देण्याचे सत्र कायम राखले. त्याने कायले वेरेयने ( ९), मार्को यानसेन ( ११) आणि केशव महाराज ( ३) यांना बाद करून आफ्रिकेची अवस्था ७ बाद १११ अशी दयनीय केली. तसेच दक्षिण आफ्रिकेत कसोटीत डावात ३ वेळा पाच विकेट्स घेण्याच्या जवागल श्रीनाथ यांच्या विक्रमाशीही जसप्रीतने बरोबरी केली. आशिया खंडाबाहेर ८ वेळा डावात ५ विकेट्स घेण्याच्या इशांत शर्माच्या ( ५० सामने) विक्रमाशी जसप्रीतने ( २८ सामने) बरोबरी केली. या विक्रमात कपिल देव हे ( ९) अव्वल स्थानावर आहेत आणि त्यांनी ४५ कसोटींत हा पराक्रम केला आहे.  

एडन मार्करम अर्धशतक झळकावून एका बाजूने खिंड लढवताना दिसला. जसप्रीतने त्याचीही विकेट मिळवून दिली होती, परंतु लोकेश राहुलने सोपा झेल टाकला. ७४ धावांवर मार्करमला जीवदान मिळाले. त्यानंतर त्याने प्रसिद्ध कृष्णाच्या एका षटकात २० धावा कुटल्या आणि संघाला मोठ्या आघाडीच्या दिशेने घेऊन चालला. त्याने ९९ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि आफ्रिकेची आघाडी ६० धावांपर्यंत नेली आहे. 


 

Web Title: IND vs SA 2nd Test : First dropped catch of the series from KL Rahul! Extra bounce from Jasprit Bumrah. Aiden Markram smashed century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.