IND vs SA 2nd ODI Rohit Sharma Got Out On A Smart Review From Quinton De Kock : रायपूरच्या मैदानातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा स्वस्तात माघारी फिरल्याचे पाहायला मिळाले. चौथ्या षटकापर्यंत फक्त ३ चेंडूचा सामना करणाऱ्या रोहित शर्मानं पाचव्या षटकात स्ट्राइक मिळताच तीन सलग चौकार मारत बर्गरचा समाचार घेतला. पण चौकाराच्या हॅटट्रिकनंतर याच षटकात रोहित शर्माच्या रुपात भारतीय संघाने पहिली विकेट गमावली. रोहित शर्मा या सामन्यात ८ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने १४ धावांची खेळी केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ना पंचाला कळलं ना गोलंदाजाला, पण क्विंटन डीकॉकमुळे रोहितचा खेळ थांबला
पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर बर्गरनं टाकलेला चेंडू रोहितच्या बॅटची किंचित कड घेऊन विकेट किपर क्विंटन डी कॉकच्या हाती विसावला. गोलंदाजी करणाऱ्या बर्गरलाही चेंडू बॅटला लागला आहे ते समजलं नव्हते. त्यामुळे त्याने हाफ अपीलच केली. मैदानातील पंचांनीही रोहित शर्माला नाबाद ठरवलं. पण विकेटमागे क्विंटन डीकॉकनं आत्मविश्वास दाखवला अन् टेम्बा बावुमानं अनुभवी गड्यावर विश्वास दाखवत रिव्ह्यू घेतला. जो दक्षिण आफ्रिकेसाठी फायदाचा ठरला. रिप्लेमध्ये चेंडू बॅटची कड घेऊन आल्याचे स्पॉट झाले अन् मैदानातील पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. ही विकेट बर्गरच्या खात्यात जमा झाली असली तरी त्याचे सगळे श्रेय हे क्विंटन डी कॉकलाच द्यावे लागेल.
Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड!
रायपूरच्या मैदानातील वनडेतील पहिला अर्धशतकवीर आहे रोहित
रायपूरच्या मैदानात याआधी भारतीय संघाने एकमेव वनडे सामना खेळला होता. २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाकडून रोहित शर्माने अर्धशतकी खेळी साकारली होती. ५० चेंडूत त्याने ५१ धावांची खेळी केली होती. रांची कसोटीतील अर्धशतकानंतर पुन्हा एकदा तो या मैदानावर आपली छाप सोडेल, अशी अपेक्षा होती. पाचव्या षटकातील तीन सलग चौकार मारून त्याने तसे संकेतही दिले. पण याच षटकात त्याला माघारी फिरावे लागले.