Join us  

अजिंक्य रहाणे अन् चेतेश्वर पुजाराला संघातून का काढलं? हरभजन सिंग सिलेक्टर्सवर भडकला

पहिल्या कसोटीत भारताला ना चांगली गोलंदाजी जमली, ना चांगली फलंदाजी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 10:17 PM

Open in App

Harbhajan Singh on Pujara Rahane, IND vs SA: पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर आता टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सेंच्युरियन कसोटीत टीम इंडियाने ना फलंदाजी नीट केली, ना गोलंदाजी. या कसोटी मालिकेसाठी निवड समितीने संघातील युवा खेळाडूंवर अधिक विश्वास व्यक्त केला. तर अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या कसोटी क्रिकेटमधील बड्या खेळाडूंना या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. यावर आता टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने संताप व्यक्त केला आहे.

पुजारा-रहाणेला वगळण्यावर भज्जीकडून प्रश्नचिन्ह

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत बंदी घालण्यात आली आहे. आता आपल्या यूट्यूब चॅनलवर याबद्दल बोलताना हरभजन सिंग म्हणाला की, रहाणे आणि पुजाराला कसोटी संघातून का वगळण्यात आले हे मला समजत नाही. या दोन्ही खेळाडूंनी संघासाठी सर्वत्र धावा केल्या आहेत. जर आपण मागील विक्रमांबद्दल बोललो तर पुजाराने विराट कोहलीइतकेच योगदान दिले आहे. तरीही पुजाराला संघातून वगळण्यात आले जे मला समजू शकत नाही. कसोटी क्रिकेटमध्ये पुजारापेक्षा चांगला फलंदाज आमच्याकडे नाही.

रहाणे आणि पुजारा हे दोघेही २०२३ च्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत सहभागी झाले होते. या मालिकेनंतर या दोघांनाही कसोटी संघातून वगळण्यात आले. या दोन्ही खेळाडूंनी परदेशी खेळपट्ट्यांवर भारतीय संघासाठी महत्त्वाच्या प्रसंगी अनेक चमकदार खेळी खेळल्या आहेत. अशा परिस्थितीत एवढ्या मोठ्या मालिकेतून दोन्ही खेळाडूंना वगळणे टीम इंडियावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. सेंच्युरियन कसोटीत ज्या प्रकारे टीम इंडियाच्या विकेट्स सातत्याने पडत होत्या, त्याच्याकडे पाहता संघात अनुभवी खेळाडू असणे किती महत्त्वाचे आहे, हे सिद्ध झाले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाहरभजन सिंगचेतेश्वर पुजाराअजिंक्य रहाणे