DSP Siraj Broke Stumps : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात मियाँ मॅजिकचा खास शो पाहायला मिळाला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा तग धरून बॅटिंग करत असताना सिराजनं दुसऱ्या बाजूनं अखेरच्या दोन विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव खल्लास केला. यात सिराजनं सायमन हार्मनला क्लीन बोल्ड करताना स्टंपचे दोन तुकडे केल्याचे पाहायला मिळाले. सिराजनं घेतलेल्या या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सिराजची स्टंप तोड गोलंदाजी, सायमन चेंडू सोडून फसला!
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३ बाद ९३ धावांवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहनं बावूमाला उत्तम साथ देणाऱ्या कॉर्बिन बॉशला तंबूचा रस्ता दाखवत १३५ धावांवर दक्षिण आफ्रिकेला आठवा धक्का दिला. त्यानंतर कार्यवाहू कर्णधार रिषभ पंतनं मोहम्मद सिराजच्या हाती चेंडू सोपवला. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ५४ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने सायमन हार्मरला क्लीन बोल्ड केले.
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
स्टंपचे दोन तुकडे करत फोडली जोडी; इथं पाहा व्हिडिओ
हार्मर याने सिराजचा टाकलेला चेंडू सोडला अन् तो कमालीचा स्विंग होत ऑफ स्टंपवर आदळला. एवढेच नाही तर या स्टंपचे दोन तुकडे झाल्याचे पाहायला मिळाते. याच षटकातील अखेरच्या चेंडूवर केशव महाराज याला पायचित करत सिराजनं दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव आटोपण्यात मोलाची भूमिका बजावली.
विकेटसाठी संघर्ष केला, पण शेवटी डाव साधलाच
मोहम्मद सिराजनं पहिल्या डावातही दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. या डावात त्याने मार्को यान्सेन आणि काइल व्हेरेइन यांची विकेट घेतली होती. दुसऱ्या डावातील दोन विकेट्स घेत सिराजनं या सामन्यात ४ विकेट आपल्या खात्यात जमा केल्या. या सामन्यात सिराज सुरुवातीच्या षटकात विकेट घेण्यात संघर्ष कराताना दिसला. पण शेवटी दोन्ही डावात प्रत्येकी २-२ विकेट्सचा डाव साधत आपली उपयुक्तता सिद्ध केली.