Virat Kohli, IND vs SA, 1st ODI Live Updates : विराट कोहली आफ्रिकेला सडेतोड उत्तर देणार; पहिल्याच वन डेत मोठमोठे पराक्रम करणार

India vs South Africa, 1st ODI Live Updates : टेम्बा बवुमा आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन या जोडीनं भारतीय संघाची डोकेदुखी वाढवताना चौथ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:36 PM2022-01-19T17:36:26+5:302022-01-19T17:38:01+5:30

whatsapp join usJoin us
IND vs SA, 1st ODI Live Updates : Virat Kohli on the verge of surpassing Dravid, Ganguly in 1st ODI vs South Africa if he scores 27 runs | Virat Kohli, IND vs SA, 1st ODI Live Updates : विराट कोहली आफ्रिकेला सडेतोड उत्तर देणार; पहिल्याच वन डेत मोठमोठे पराक्रम करणार

Virat Kohli, IND vs SA, 1st ODI Live Updates : विराट कोहली आफ्रिकेला सडेतोड उत्तर देणार; पहिल्याच वन डेत मोठमोठे पराक्रम करणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs South Africa, 1st ODI Live Updates : टेम्बा बवुमा आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन या जोडीनं भारतीय संघाची डोकेदुखी वाढवताना चौथ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी केली. ३ बाद ६८ धावांवरून या दोघांनी आफ्रिकेचा डाव सावरला आणि भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पण, त्यांना तोडीस  तोड उत्तर देण्यासाठी माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) सज्ज झाला आहे. आजच्या सामन्यात त्याला मोठमोठे पराक्रम करण्याची संधी आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराट कोहली ८व्या स्थानावर आहे आणि भारतीयांमध्ये त्याचा चौथा क्रमांक येतो. आजच्या सामन्यात त्यानं २७ धावा केल्यास तो राहुल द्रविड ( १३०९) आणि सौरव गांगुली ( १३१३) यांचा विक्रम मोडून दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. सचिन तेंडुलकर ( २००१) अव्वल स्थानावर आहे. या विक्रमात रिकी पाँटिंग ( १८७९), कुमार संगकारा ( १७८९), स्टीव्ह वॉ ( १५८१) आणि शिवनरीन चंद्रपॉल ( १५५९) हे अन्य चार फलंदाज आहेत.  

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या १२८७ धावांपैकी ८८७ धावा या कोहलीनं दक्षिण आफ्रिकेतच केल्या आहेत. ३३ वर्षीय कोहलीनं या मालिकेत १७१ धावा केल्या तर तो राहुल द्रविड ( ९३०) व गांगुली ( १०४८) यांचा विक्रम मोडू शकतो. याही विक्रमात सचिन तेंडुलकर ( १४५३) व पाँटिंग ( १४२३) आघाडीवर आहेत.  

विराट कोहलीनं या मालिकेत ११३ धावा केल्यास चार किंवा अधिक देशांमध्ये १०००+ धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज बनेल. त्यानं भारतात ४९९४ धावा, इंग्लंडमध्ये १३१६ आणि ऑस्ट्रेलियात १३२७ धावा केल्या आहेत. तो राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचा विक्रम मोडून सौरव गांगुलीसह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर येईल. सचिन तेंडुलकरनं सहा देशांविरुद्ध १०००+ धावा केल्या आहेत.

Web Title: IND vs SA, 1st ODI Live Updates : Virat Kohli on the verge of surpassing Dravid, Ganguly in 1st ODI vs South Africa if he scores 27 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.