Join us  

IND vs SA, 1st ODI Live Updates : दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकली; बघा लोकेश राहुलनं प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी दिली

India vs South Africa, 1st ODI Live Updates : कसोटी मालिकेतील पराभव विसरून टीम इंडिया नव्या निर्धारानं वन डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 1:38 PM

Open in App

India vs South Africa, 1st ODI Live Updates : कसोटी मालिकेतील पराभव विसरून टीम इंडिया नव्या निर्धारानं वन डे मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. लोकेश राहुलच्या ( KL Rahul) नेतृत्वाखाली प्रथमच टीम इंडिया वन डे मालिका खेळणार आहे आणि विराट कोहली ( Virat Kohli) ७ वर्षांत  प्रथमच फक्त फलंदाज म्हणून संघात खेळताना दिसणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतार्यंत ८४ वन डे सामने झाले आहेत आणि त्यात भारतानं ३५ विजय  मिळवले आहेत. आफ्रिकेच्या नावावर ४६ विजय आहेत आणि तीन सामने अनिर्णीत राहिले.   दक्षिण आफ्रिकेत उभय संघ ३४ वेळा एकमेकांना भिडले आणि त्यात  भारतानं केवळ १० सामने जिंकले आहेत आफ्रिकेच्या नावावर २२ विजय आहेत.  भारतीय संघात भुवनेश्वर कुमारनं पुनरागमन केलं. वेंकटेश अय्यरनं आज वन डे संघात पदार्पण केलं. तर चार वर्षांनंतर आर अश्विन वन डे संघात परतला आहे. शिखर धवन व लोकेश सलामीला येणार असल्यानं ऋतुराज गायकवाडला आज संधी मिळालेली नाही.

भारताचा संघ ः लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, वेंकटेश अय्यर,  शार्दूल ठाकूर, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल. ( #India XI: KL Rahul (c), Shikhar Dhawan, Virat Kohli Shreyas Iyer, Rishabh Pant (wk), Venkatesh Iyer, Shardul Thakur, Ravichandran Ashwin, Bhuvneshwar Kumar, Jasprit Bumrah, Yuzvendra Chahal ).  

दक्षिण आफ्रिकेचा संघ - क्विंटन डी कॉक, जे मलान, एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, टेम्बा बवुमा, डेव्हिड मिलर, ए फेहलुकवायो, केशव महाराज, तब्रेज शम्सी, मार्को येनसेन, लुंगी एनगिडी ( 1st ODI. South Africa XI: Q de Kock (wk), J Malan, A Markram, R van der Dussen, T Bavuma (c), D Miller, A Phehlukwayo, K Maharaj, T Shamsi,  M Jansen, L Ngidi )  

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकालोकेश राहुल
Open in App