Join us

IND vs PAK : युजवेंद्र चहलने साजरे केले बळींचे अर्धशतक

चहलने आसिफ अलीला त्रिफळाचीत करत आपला पन्नासावा बळी साजरा केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 20:16 IST

Open in App
ठळक मुद्देया सामन्यात भारताला पहिला बळी मिळवून द्यायचा मानही चहलने पटकावला.

दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध पाकिस्तान : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलचे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बळींचे अर्धशतक पूर्ण झाले. चहलने आसिफ अलीला त्रिफळाचीत करत आपला पन्नासावा बळी साजरा केला.

 

या सामन्यात भारताला पहिला बळी मिळवून द्यायचा मानही चहलने पटकावला. चहलने पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकला पायचीत पकडत सामन्यातील पहिला बळी मिळवला. हा त्याचा कारकिर्दीतील ४९वा बळी होता.

 

चहलला अखेरच्या षटकांमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीला कर्णधार रोहित शर्माने आणले. यावेळी चहलने अलीला बाद केले आणि आपले बळींचे अर्धशतक साजरे केले.

टॅग्स :युजवेंद्र चहलआशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तान