Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK : शांत स्वभावाचा शिवम दुबे लाइव्ह सामन्यातच कुणावर भडकला? अशी काढली भडास

अगदी शांत स्वभावाचा म्हणून ओळखला जाणार स्टार ऑलराउंडर शिवम दुबे भर मैदानात अचानकच भडका.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 22:18 IST

Open in App

टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारत आणि पाकिस्तान सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या हाय-होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर २० षटकांत ७ बाद १७५ धावांचे लक्ष ठेवले आहे. मात्र, या डावाच्या शेवटच्या षटकात एक अशी घटना घडली ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अगदी शांत स्वभावाचा म्हणून ओळखला जाणार स्टार ऑलराउंडर शिवम दुबे भर मैदानात अचानकच भडका.

शिवम दुबे रन आऊट -शिवम दुबे भडकला कारण तो 'रन आऊट' झाला. या डावाच्या २० व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिंकू सिंगने शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर डीप एक्स्ट्रा कव्हरला शॉट खेळला. यानंतर रिंकूने दुसऱ्या धावेसाठी दुबेला कॉल दिला. मात्र, तो अचानकच थांबला. यामुळे शिवम दुबे धावबाद झाला.  यामुळे त्याचा राग अनावर झाला आणि तो भडकला. मैदानाबाहेर जाताना तो रिंकूवर मोठ्याने ओरडताना आणि संताप व्यक्त करताना कॅमेऱ्यात कैद झाला. विशेष म्हणजे, नामीबियाविरुद्धच्या सामन्यातही रिंकू नॉन-स्ट्राइकवर असतानाच दुबे धावबाद झाला होता.

दुबेची महत्त्वाची खेळी आणि ईशानचा धमाका -दुबेची महत्त्वाची खेळी आणि ईशानचा धमाका -डावाच्या सुरुवातीलाच हार्दिक पंड्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. शिवम दुबे सहाव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता. त्याने १७ चेंडूत २७ धावांची (३ चौकार, १ षटकार) महत्त्वपूर्ण खेळी खेळली. रिंकू सिंगनेही ४ चेंडूत ११ धावा केल्या. मात्र, या डावाचा खरा हिरो ठरला ईशान किशन. ईशानने ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७७ धावा कुटल्या आणि पाकिस्तानी गोलंदाजांचे पार कंबरडेच मोडले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shivam Dube's outburst at Rinku Singh after run-out in IND vs PAK match.

Web Summary : During the India-Pakistan match, Shivam Dube was run out due to Rinku Singh's hesitation, causing Dube to express his anger on the field. Dube scored 27 crucial runs, while Ishan Kishan's explosive 77 propelled India to 175/7.
टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तान