IND vs PAK, Virat Kohli Kiss Wedding Ring After Century Anushka Sharma Reaction Viral : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील (Champions Trophy 2025) पाचवा सामना भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात खेळवण्यात आला. रविवारी दुबईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात किंग कोहलीच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं ६ विकेट्स राखून दमदार विजय नोंदवला. जिथं मोठा मॅटर तिथं कोहली नावाच्या रनमशिनच पळतं मीटर, हा सीन पुन्हा एकदा दिसून आला.
शतकासह दुबईचं मैदान गाजवल, मग किंग कोहलीनं अनुष्कावरील प्रेमही व्यक्त केलं
विराट कोहलीनं पाकिस्तान विरुद्ध आणखी एक अवस्मरणीय खेळी करताना वनडे कारकिर्दीतील ५१ वे शतक साजरे केले. भारत-पाकिस्तान सामन्यावेळी रोहितची पत्नी रितिका सजदेहची स्टँडमध्ये खास झलक पाहायला मिळाली. पण यावेळी अनुष्का शर्मा कुठं दिसली नाही. पण विराट कोहलीनं शतक साजरं करताच आपल्या खास अंदाजात बायकोवरील प्रेम व्यक्त केल्याचा सीन पाहायला मिळाला. त्यामुळे भारत पाक सामन्यानंतर पुन्हा एकदा विरुष्काची कपल गोल सेट करणारी खास स्टोरी चर्चेत आलीये.
विराटनं वेडिंग रिंग किस अन् ...
शतकी खेळीनंतर विराट कोहलीनं वेडिंग रिंग किस करत अनुष्कावरील प्रेम व्यक्त केलं. मग अनुष्का मागे कशी राहिल. तिने खास पोस्टच्या माध्यमातून नवरोबाच्या खेळीला दाद दिल्याचे पाहायला मिळाले. शतकी रोमान्सनंतर विरुष्कानं खास फ्रेमसह एकमेकांवरील प्रेम दाखवून दिल्याची गोष्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
शतकी रोमान्सनंतर कोहलीनं अनुष्कासाठी पेश केला प्रेमाचा नजराणा
विराट कोहलीनं वनडे वर्ल्ड कप २०२३ च्या सेमीफायनलमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील अखेरच शतक साजरे केले होते. न्यूझीलंडविरुद्ध त्याने शतकांच अर्धशतक साजरे केल्यावर जवळपास १५ महिन्यानंतर त्याच्या भात्यातून शतकी रोमान्सवाली खेळी पाहायला मिळाली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर विराट कोहलीनं गळ्यातील चेनमध्ये असलेल्या वेडिंग रिंगला किस करत पुन्हा एकदा अनुष्कावरी प्रेम दाखून दिले.
अनुष्काची पोस्ट चर्चेत
Anushka Sharma Insta Story For Virat Kohli
विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर अनुष्का शर्मानं इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक खास स्टोरी शेअर केलीय. कोहलीच्या शतकी खेळीनंतरचा खास फोटो अन् हार्टवाल्या इमोजीसह तिने नवरोबाच्या खेळीवर प्रेमाची बरसात केलीये. कोहलीच्या खेळीनंतर आता दोघांनी एकमेकांवर दाखवून दिलेल्या प्रेमाची सोशल मीडियावर चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.
Web Title: IND vs PAK, Virat Kohli Kiss Wedding Ring After Century Anushka Sharma Reaction Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.